महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ, कोल्हापूर विभाग तर्फे कला शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्त मा सुरज मांढरे साहेबांना व शिक्षण संचालक पुणे मा.संपतजी सुर्यवंशी साहेब यांना सादर

कोल्हापूर…. महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने आज मंगळवार दिनांक.. 27मार्च 2024 रोजी आज दिनांक 27/03/2024 रोजी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने मा. शिक्षण आयुक्तसो यांना आणि मा. शिक्षण संचालकसो पुणे यांना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले मा. शिक्षण आयुक्तसो मा. सुरज मांढरेसो साहेब पुणे यांना आणि मा. मा.संपत जी सूर्यवंशी साहेब शिक्षण संचालक पुणे यांना महाराष्ट्र संघ महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ यांच्या वतीने मा.सुहास पाटील आणि सागर दीक्षित यांनी 15 मार्च 2024 रोजीच्या जीआर हा 500 पट संख्येला एक कलाशिक्षक अन्यायकारक हे आहे पटवून देऊन 200 पट संख्येला एक कलाशिक्षक संचमान्यtet द्यावा ही मागणी करण्यात आली त्याचबरोबर लोककलेला इयत्ता दहावीला सवलतीचे दहा गुण आहेत त्याच पद्धतीने इंटरमिजिएट ग्रेडला पडणाऱ्या ए ग्रेडला अनुक्रमे बोर्डाने 15 गुण द्यावे बी श्रेणीला दहा गुण द्यावे आणि c श्रेणी पाच गुण द्यावे अशी मागणी राज्याची कोषाध्यक्ष सुहास पाटील आणि विभागाचे उपाध्यक्ष सागर दीक्षित सर यांनी शिक्षण संचालक यांना भेटून निवेदनाद्वारे चर्चा करून मागणी करण्यात आली.साहेब यांना कला शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या बाबत महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले आहे.सदर निवेदन प्रत्यक्ष भेटीअंती महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे धडपडणारे तरूण तडफदार प्रदेश कोषाध्यक्ष मा.सुहास पाटील, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष मा.धनाजी कराडे, कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष मा सागर दिक्षित, कोल्हापूर विभागीय सचिव मा.मोहन जाधव यांनी दिले.व यावेळी सकारात्मक चर्चा देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे अभ्यासु नेतृत्व प्रदेश अध्यक्ष मा.नानासो.प्रल्हाद साळुंके, विविध रंगभूषेतून आंदोलन करणारे लढवय्ये प्रदेश सरचिटणीस मा. प्रल्हाद शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कार्यकारिणी, कोल्हापूर विभागीय कार्यकारणी, सांगली जिल्हा कार्यकारिणी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना राज्यातील कला शिक्षकांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रदेश कोषाध्यक्ष सुहास पाटील, कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष सागर दिक्षित व इतर पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले.व अधिकारींशी चर्चा करुन कला शिक्षक पदभरती 200 विद्यार्थी संख्या ग्रुहीत धरूनच राज्यातील शासनमान्य खाजगी प्राथमिक, माध्यमिक, व शासकीय आश्रम शाळा खाजगी आश्रम शाळा येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एक कला शिक्षकाची आवश्यकता आहे. प्रत्येक शाळेत एक कलाशिक्षक भरण्यात यावा या व इतर मागण्यांसाठी निवेदन दिले गेले. आज महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या कोल्हापूर विभागीय संपूर्ण टीमचे प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन.. महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ सतत कला शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी खरी लढणारी संघटना आहे.एक कुटुंब आहे.तरी भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक कला शिक्षक एकत्र येऊन आपले अस्तित्व व कला विषय संपवण्यामागे कटकारस्थान रचणारे यांना चाप दिला पाहिजे*👊👊👊👊👊 चला तर मग एक होऊया *महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ ची ताकद वाढवु या*
प्रल्हाद साळुंके प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ
प्रल्हाद शिंदे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ
सुहास पाटील प्रदेश कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ
रामचंद्र इकारे, प्रदेश उपाध्यक्ष सोलापूर
धनाजी कराडे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष
सागर दिक्षित कोल्हापूर विभागीय उपाध्यक्ष
मोहन जाधव कोल्हापूर विभागीय सचिव
व सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ*👊👊👊

.. प्रल्हाद साळुंके प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ , प्रल्हाद शिंदे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ*👊👊👊👊👊👊👊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *