*कै. माननीय डॉक्टर सुधाकर बोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान
नंदुरबार….दि १८.०३.२०२४.. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित विविध शाखांमध्ये आज अभय युवा कल्याण केंद्र या संस्थेचे माजी अध्यक्ष,कै.मा. डॉक्टर सुधाकरजी मोतीराम बोरसे, माजी अध्यक्ष यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर अण्णासाहेब म्हणजे सर्वांचे आदरस्थान, त्यांनी गोरगरीब जनतेसाठी आरोग्य सेवेतून आणि धुळे जिल्हा होमगार्ड समादेशक म्हणून प्रत्यक्ष काम करून आपले नावलौकिक केले आहे. आज अभय युवा कल्याण केंद्राच्या विविध विद्या शाखा येथील कर्मचारी यांनी कैलासवासी अण्णा साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ राजीव गांधी माध्यमिक विद्यालय धुळे यांनी मातोश्री वृद्धाश्रमात प्रत्यक्ष भेट देऊन तेथे मुख्याध्यापक श्री संजय पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत फळ वाटप करण्याचा कार्यक्रम केला, अभय महिला महाविद्यालयात ज्येष्ठ पत्रकार घुगे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे, तर विविध विद्या शाखांमध्ये अण्णासाहेबांच्या प्रतिमापूजनासह सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे.अशाच प्रकारे आज नंदुरबार येथील सिविल हॉस्पिटल मध्ये सायंकाळी 4.00 वाजता.अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे ता जि नंदुरबार येथील उपशिक्षक श्री प्रल्हाद गो.साळुंके यांनी रक्तदान केले. यावेळी डॉक्टर रमा वाडीकर, बिटीओ, यांनी सांगितले की रक्ताचा पुरवठा फार कमी स्वरूपात आहे. रक्तदान करणारे आम्हाला मिळत नाहीत. आज तरुणांना रक्तदान करण्याची जास्त गरज आहे. कारण ज्या रुग्णांना खऱ्या अर्थाने रक्ताची गरज आहे त्यांना पैसे देऊनही रक्त मिळत नाही. आपण स्वतःहून हा रक्तदान करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे स्वागत आम्ही करतो. अशा स्वरूपात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साप्ताहिक पोलीस व्हिजनच्या माध्यमातून आजच्या तरुणांना आम्ही आव्हान करू इच्छितो की इतरत्र पैसा खर्च करण्यापेक्षा दर सहा महिन्यानंतर आपण जर रक्तदान केले तर हे सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. आपण रक्तदान करावे रक्तदान करण्यासाठी तरुण मुलांनी पुढे यावे असे आवाहन आम्ही डॉक्टर अण्णासाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने करत आहोत. सुंदरदे येथील शिवा नाईक हे कार्यकर्ते नेहमी रक्तदान करण्यासाठी स्वखर्चाने तरुणांना व रक्तदात्यांना सिविल हॉस्पिटल नंदुरबार पर्यंत पोहोचवत असतात त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आले.यावेळी जय सोनवणे वैज्ञानिक अधीक्षक, धनराज चव्हाण अधिपरीचालक, समाधान पाटील शिपाई, महिमा वळवी वैज्ञानिक अधिकारी हे उपस्थित होते. त्यांनी प्रल्हाद साळुंखे यांना रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र देखील दिले. माननीय कै.डॉक्टर अण्णासाहेब सुधाकर जी बोरसे हे डॉक्टर होते. त्यांचे सामान्य जनतेसाठी वैद्यकीय सेवा खूप मोठी होती. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांमधून अनेकांना नोकरी दिलेली आहे. गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणाची सोय करून दिली आहे म्हणून अण्णा साहेबांच्या या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आपल्या शरीरातील प्रत्येक रक्ताचा एक एक थेंब गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळावा या शुद्ध हेतूने रक्तदान करण्याचा मानस होता. कैलासवासी माननीय डॉक्टर सुधाकर बोरसे यांना सा पोलीस व्हिजन धुळे तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली*…. बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे