सोलापुर जिल्ह्यात प्रथमच पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत पहिला गुन्हा दाखल

सावधान पत्रकारांना धमकावले तर!!!! होईल गुन्हा दाखल

धुळे………काही समाजकंटकांना समाजासाठी पत्रकारिता करणार्या पत्रकारांचे वार्तांकन पचनी पडत नाही.भ्रष्टाचार करणारे असो की, काही चुकीचे नियमबाह्य काम असो पत्रकार त्यांच्या लेखनातून समाजाला जागृत करत असतो.मात्र काहींना ते पचणी पडत नाही.मग ते बातमी छापणार्यावर हल्ला करतात.मात्र आता शासनाने पत्रकार संरक्षण कायदा केला आहे.या कायद्यात पत्रकार संरक्षण कायदा केला आहे.कायद्याचा वापर करून पत्रकारांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.

या घटनेत, पत्रकार धीरज शेळके यांनी उमेद अभियान अंतर्गत काम करणाऱ्या महिलांचे मानधन न मिळाल्याबाबत वार्तांकन केले होते. त्यानंतर, स्वयम शिक्षण प्रयोग प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांनी पत्रकार शेळके यांना धमकावून धक्काबुक्की केली. यामुळे, पत्रकार शेळके यांना शारीरिक आणि मानसिक त्रास झाला.

या घटनेनंतर, पत्रकार शेळके यांनी या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात पत्रकार संरक्षण कायद्याचेही उल्लंघन झाले असल्याचे म्हटले आहे.

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत, पत्रकारांना त्यांच्या पत्रकारितेच्या कामात अडथळा आणणाऱ्या किंवा त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तींना शिक्षा होऊ शकते. या कायद्याचा वापर करून पत्रकारांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.

गटविकास अधिकारी यांनी याबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर बराच काळ काहीही कारवाई न झाल्यामुळे पत्रकार धीरज शेळके यांनी स्वयम शिक्षण प्रयोग प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने यांना त्याबाबत प्रतिक्रिया मागितली असता, वार्तांकन केल्याचा राग मनात धरून किरण माने यांनी संपादक पत्रकार धीरज शेळके यांना धक्काबुक्की करत धमकावले. तसेच वार्तांकन चालू असताना वार्तांकनासाठी वापरण्यात येत असलेला मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी सदर प्रोजेक्ट मॅनेजर किरण माने याचे विरोधात भादवि कलम 323, 504, 506 तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी करीत आहेत.

2017 साली अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत दाखल झालेला सोलापूर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे…… बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *