जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुजर जांभोली येथे सहावी शिक्षण परिषद मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी संपन्न

जिल्हा परिषद शाळा गुजर जांभोली येथे सहावी शिक्षण परिषद मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी संपन्न

नंदुरबार.. शिक्षणाचा वसा कायम सुरू राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यापासून एक नवीन व चांगला उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तो उपक्रम म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खाजगी प्राथमिक शाळा, शासकीय आश्रम शाळा,खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळा, या शाळांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असतात. या शाळा सुंदर व बोलक्या असाव्यात, सुंदर असाव्यात, तेथे मुलांना शिक्षण घेताना मन रमले पाहिजे, या चांगल्या संकल्पनेतून हा उपक्रम शाळांमधून राबवला जात आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सुंदरदे केंद्रात एकुण प्राथमिक शाळा 14, माध्यमिक शाळा 3,व एक खाजगी प्राथमिक शाळा असून या सुंदरदे केंद्राचे अभ्यासू व जाणकार केंद्रप्रमुख, श्री. एल. जी. देसले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या केंद्राचा कायापालट केलेला आहे. प्रत्येक शिक्षकाला समजून सांगत त्यांनी आपल्या केंद्रामध्ये एकोपा ठेवलेला आहे. आज शुक्रवार दिनांक एकोणावीस जानेवारी 2024 रोजी सुंदरदे केंद्रातील प्राथमिक माध्यमिक शाळांची एक दिवसाची शिक्षण परिषद मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी संपन्न झाली. ही सहावी शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गुजर जांबोली ता जि नंदुरबार येथील प्रांगणात पार पडली. या परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख एल.जी देसले साहेब यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात गुजर जांभोली जि प प्राथमिक शाळेचे लहान विद्यार्थी यांनी देव मोगरा देवीची आराधना करून व स्वागत गीत म्हणून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करून शिक्षणाची ज्योत पेटवून करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद शाळा गुजर जांभोली चे मुख्याध्यापक श्री महेन्द्र भिका चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रम साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.प्रा.संजय शिंदे जिजामाता बी.एड काँलेज, नंदुरबार हे होते. त्यांनी आपल्या मनोगतात शिक्षण व्यवस्था ही नवीन तंत्रज्ञानाला अनुसरून करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही घोकंपट्टी करून अध्यापन करू नका. किंवा शिकवू नका. त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विचार करून त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांचा विचार करून त्यांना आपल्या जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण द्या. विद्यार्थ्याला चांगले इंग्रजी यायलाच पाहिजे असा अट्टाहास करू नका. आत्ताच्या विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता हा विषय महत्त्वाचा आहे. शासनाला बऱ्याच उशिराने का होईना परंतु हे चांगले ज्ञात झाले की, आर्थिक साक्षरता होणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्याला आर्थिक व्यवहार आर्थिक नियोजन कसे करतात ते महत्त्वाचे आहे. त्याने एक रुपया मिळवला कसा, आणि तो खर्च करायचा कसा? याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक पैशांची देवाणघेवाण कळणे गरजेचे आहे ते खरे शिक्षण आहे. आनंदी शिक्षण द्यायचे आहेच. परंतु त्यासोबत त्याला आठवडे बाजारात तो गेल्यावर त्याला व्यवहार ज्ञानाची फार गरज आहे. म्हणून आपल्या मुलांना अमुकच चांगल्या शाळेत टाकल्यावर तो अधिकारी होतो ही कल्पना मुळात चुकीची आहे. मी स्वतः तीन विषयांमध्ये पि.एच.डी केलेली असून अभ्यास मंडळावर आहे. मी वासखेडी तालुका साक्री या सामान्य प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतलेले आहे म्हणून मी व त्यावेळेस माझ्यासोबत असलेले अनेक विद्यार्थी माझे मित्र आज क्लासवन ऑफिसर आहेत. म्हणून आपल्या मुलांना अट्टहास करून चांगल्याच शाळेत पाठवायचे असे करू नका. आपली शाळा आणि आपले विद्यार्थी हाच आपला खरा 5000 स्क्वेअर फुट प्लॉट आहे. जो शिक्षक विद्यार्थ्यांना खरा घडवतो त्यांचे मुले अधिकारी होतात त्यांना चांगले फळ मिळते हा आजवरचा अनुभव आहे. जे टाईमपास करून शिक्षकाची नोकरी करतात त्यांचा परिवार व ते कधीही आज सुखी दिसत नाहीत अशा विविध उदाहरणांनी त्यांनी शिक्षकांची मने जिंकून घेतली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद साळुंखे यांनी आपल्या मनोगतात भाषा म्हणजे काय? विद्यार्थी भाषा कुठून शिकतो व कसा शिकतो!! यावर अनेक उदाहरणे देऊन शिक्षकांच्या अध्यापनामध्ये चित्राला किती महत्त्व आहे याचे उदाहरण देऊन स्पष्टीकरण केले. चांगल्या शिक्षकांच्या कामाला देखील अनेक अडथळे निर्माण केले जातात समाजातील काही वाईट प्रवृत्ती चांगल्या काम करणाऱ्याला देखील त्रास होईल अशी कृती करत असतात त्यातून शिक्षकाची नोकरी करणे आता कठीण झाले आहे शिक्षकाला देखील संरक्षण असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. शिक्षण परिषदेचे अध्यक्ष केंद्र प्रमुख एल.जी देसले साहेब यांनी गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे व स्वच्छ शाळा सुंदर शाळा याबाबत मार्गदर्शन केले. निरक्षर लोकांच्या नोंदी तसेच शालेय पोषण आहार बाबत शाळा परिसर स्वच्छ करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण प्रशासकीय बाबी शिक्षकांना समजावून दिल्या.

  आज दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा गुजर जांभोली येथे शिक्षण परिषद घेण्यात आली. यावेळी एसबीआय बँकेचे मॅनेजर श्री चौधरी साहेब यांनी देखील यूपीआय, एटीएम कार्ड, व इतर व्यवहार आपण जेव्हा ऑनलाईन करतो त्याबाबत फसवणूक कशी केली जाते आपल्या खात्यावरील रक्कम हँकर कशा पद्धतीने रक्कम त्यांच्या खाती वळून नेतात याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली.सायबर क्राईम द्वारा कशा पद्धतीने गुन्हे नोंदविता येतात तक्रार कशी करतात याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुजर जांभोली चे सरपंच जितेंद्र प्रल्हाद वळवी,शा.व्य.स.अध्यक्ष*- नितीन वळवी,ग्रामस्थ नमू वळवी,जगदीश वळवी,युवराज ठाकरे,हरीसेठ कोतवाल सहकारी वंदना परमार मॅडम, कमलताई पावरा मॅडम, मीनाक्षी पाडवी मॅडम. उपस्थित होते. तसेच संपूर्ण सुंदरदे केंद्रातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता शेवटी महाराष्ट्र गीताने झाली. आभार प्रदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुजर जांभोली चे मुख्याध्यापक श्री महेंद्र चव्हाण सर यांनी केले. कार्यक्रमास सुंदर चविष्ट जेवणाचा लाभ देखील शिक्षकांना देण्यात आला..... ✍️✍️✍️✍️बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे ✒️✒️✒️ प्रल्हाद साळुंके मुख्य संपादक सा पोलीस व्हिजन धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *