धुळे…सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो…..(सौ प्रतिभा प्र साळुंके).. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेत कार्यरत असणारे परंतु आता सेवानिवृत्त झालेले शिक्षक,(वय.59 वर्ष पुरुष) यांना त्यांचा गट विमा योजनेच्या रकमे पोटी, 1 लाख 33 हजार रुपये धुळे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी यांनी मंजूर केले होते. मात्र तरीदेखील देयकाची रक्कम देण्याचे व स्वीकारण्याचे काम सिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील आरोपी मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना बापूराव जगताप,रा. अभिनव रोहाऊस क्रमांक दहा गुलमोहर हाइट्स च्या मागे मखमलाबाद रोड नाशिक, वय 29 यांच्याकडे होते. परंतु मुख्याध्यापिका त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांच्यावर दबाव तंत्र वापरत होते. तक्रारदार यांनी वेळोवेळी मुख्याध्यापकांकडे त्यांची थकीत असलेली रक्कम मिळण्याकरिता वारंवार पाठपुरावा केला असता तक्रारदार यांच्याकडून रक्कम मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपये त्यांनी लाचेची मागणी केली असता. सदर सेवानिवृत्त शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे गोपनीय तक्रार दाखल केलेली होती. त्यानुसार सदर लाचेची मागणी तडजोडी अंती चार हजारांची लाच स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले. यावरून त्यांना रंगेहात लाच घेताना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई धुळे लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, व पथकातील राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल ,सुधीर मोरे ,जगदीश बडगुजर आदींनी ही कारवाई केली आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा अँटी करप्शन ब्युरो धुळे.. टोल फ्री क्रमांक..1064.
