जिल्हा परिषद सदस्या, जिल्हा परिषद नंदुरबार ताईसाहेब राजश्री गावीत यांच्या वतीने अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे तालुका जिल्हा नंदुरबार या शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बोरवेल व हँड पंप बसवन्याची तयारी पूर्ण

नंदुरबार…. जिल्हा परिषद नंदुरबार येथील जिल्हा परिषद सदस्या श्रीमती राजश्रीताई गावीत सुंदरदे गट हे नेहमी सामाजिक कार्याचा पुढाकार घेणारे नेतृत्व आहे. विविध सामाजिक कामातून त्यांनी शालेय विद्यार्थी, गोरगरिबांसाठी विविध योजना देऊन आपले कार्य चांगल्या पद्धतीने करत सामाजिक सलोखा वाढवलेला आहे. काही महिन्यांपूर्वी अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे तालुका जिल्हा नंदुरबार येथील विद्यालयातील विद्यार्थिनींना केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या मोफत सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी आपल्या मनोगतात शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी मोफत हॅन्ड पंप व बोरवेल करून दिला जाईल असे आश्वासन दिले होते आणि त्या आश्वासनाची आज पूर्तता खऱ्या अर्थाने झालेली आहे. आज शनिवार दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी शाळेत पाणी भाकण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी माजी केंद्रप्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे असे मांडवी येथील केंद्रप्रमुख श्री दरबार सिंग जयसिंग राजपूत सर कोपर्ली गावाचे रहिवासी असून त्यांचे वडील जयसिंग नथूसिंग राजपूत यांच्या संस्कारातून चांगले शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षक म्हणून दरबार सिंग राजपूत सर हे शिस्तबद्ध नोकरी करत आज सेवानिवृत्त झालेले आहेत. आपल्या मांडवी केंद्रामध्ये त्यांची पकड मजबूत होती. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक विविध उपक्रमातून सक्षम असे शिक्षण त्यांनी दिले आहे. शैक्षणिक प्रगतीचा उंच आलेख त्यांच्या केंद्रात सतत पुढे असे. प्रामाणिक काम करणारे व प्रेमळ असे गुणसंपन्न असलेले व्यक्तिमत्व दरबार सिंग राजपूत सर यांनी आज सामान्य मानधनावर त्यांच्याकडील असलेली कला यातून पाणी भरण्याचे काम 1990 पासून सुरू केले होते. आजवर त्यांनी कमीत कमी दोन लाख विहिरी व बोरवेल भागलेल्या असून त्या चांगल्या पद्धतीने पाणी त्यांना लागलेले आहे. हातात नारळ घेऊन संपूर्ण परिसर फिरतात आणि योग्य ठिकाणी पाणी आहे किती फुटावर पाणी लागेल अचूक अंदाज ते सांगतात त्यातून शेतकरी असो की सामान्य माणूस विश्वासाने त्या ठिकाणी बोर करून घेतात आणि तो सक्सेस होतो असे उदाहरणे संपूर्ण परिसरात आहे विविध तालुके आणि जिल्ह्यांमध्ये जाऊन ते पाणी भाकण्याचं काम करतात. त्यातून त्यांना मिळणारे थोडेफार मानधन ते अध्यात्मिक मार्गावर खर्च करतात. गोशाळेसाठी दान किंवा भागवत कथेसाठी योगदान असा त्यांचा दिनचर्येचा कार्यक्रम असतो. पाणी भाकण्याचं काम हे पुण्याचा काम असून देवाने मला सर्व काही दिले आहे असे म्हणून ते अतिशय उत्साहाने सामान्य गोरगरीब जनतेसाठी आपल्या कलेचा वापर करून अनेकांच्या विहिरींना जिवंत असे पाणी त्यांच्या पाणी तपासणीच्या प्रयोगातून झालेले आहे. त्यांच्या या कार्याला साप्ताहिक पोलीस व्हिजन च्या वतीने सलाम. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव पटेल सर हे देखील उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के आर सूर्यवंशी सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दोन पॉईंट पाणी तपासणीस यांनी आखणी करून दिली आहे जास्त पाणी जिथे लागेल तेथेच बोरवेल करण्याचा सल्ला दिलेला आहे. आज बोरवेल देखील लगेच करून मिळणार आणि त्यावर हँड पंप बसवला जाणार आहे अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. या सामाजिक कार्यातून मोफत बोरवेल करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार जिल्हा श्रीमती राजश्री गावित ताई यांचे आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शालिनीताई बोरसे तसेच अभय युवा कल्याण केंद्र धुळे संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर अभयदादा बोरसे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते कालिदास पाडवी यांच्या पुढाकारातून हे सामाजिक कार्य या विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री के आर सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. या बोरवेलमुळे आदिवासी मुलांना शाळेत 24 तास पाणी मिळणार आहे त्याचा विद्यार्थ्यांना आनंद आहे. बातमीपत्र वाचा साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे*✒️✒️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *