अकोला येथे काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा ५ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार

धुळे….. (बातमी पत्र सा पोलीस व्हिजन धुळे)..महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा […]

नंदुरबार… क्राईम न्यूज ब्युरो..सा पोलीस व्हिजन धुळे…. सामान्य माणूस हा आपल्या या ना त्या कामा निमित्त शासकीय कार्यालयात जात असतो परंतु तेथील भ्रष्ट काही वृत्तीचे नोकरदार हे काहीतरी चिरीमिरी घेतल्याशिवाय सामान्य माणसाचे काम होऊच द्यायचे नाही या मानसिकतेने तेथे आपली नोकरी करत असतात. भ्रष्ट मार्गाने पैसा कमावून तात्काळ मोठे होण्याचे स्वप्न ते बाळगून असतात. आणि याच मोहाने एक ना एक दिवस ते लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती सापडतात.असाच प्रकार नंदुरबार येथे घडला यात तक्रारदार पुरुष, वय- ५५ वर्षे, रा. रनाळे खुर्द , पोस्ट भादवड, ता. जि. नंदुरबार.आरोपी १) जयेश शंकर तेजी , वय ४० वर्ष , नोकरी सफाईगार, ग्रामीण रुग्णालय धानोरा.२) तुकाराम भिला भोई , वय ४३ , खाजगी चालक , रा नवी भोई गल्ली , नंदुरबार.▶️ लाच मागणी कारण:- तक्रारदार हे एस टी महामंडळ नंदुरबार येथे चालक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव तक्रारदार हे मे २०२३ पासून वैद्यकीय रजेवर आहेत. तक्रारदार यांची प्रकृती आता व्यवस्थित झाल्याने त्यांना नोकरीवर हजर व्हावयाचे होते , यासाठी तक्रारदार यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट ची आवश्यकता होती. यासाठी तक्रारदार हे फिट फॉर ड्युटी सर्टिफिकेट साठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी गेले होते. यादरम्यान आलोसे क्रमांक १ याने तक्रारदार यांना फोन करून व स्वतः जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे क्लर्क असल्याचे भासवुन , तसेच त्याचा साथीदार आरोपी खाजगी ईसम हा डॉक्टर असल्याचे भासवुन , जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिट फाॅर ड्युटी सर्टिफिकेट मिळून देतो असे सांगून, त्या बदल्यात तक्रारदाराकडून पैशांची मागणी केली. याबाबत पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आलोसे क्रमांक १ याने तक्रारदाराकडून प्रथमतः १२,०००/- रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १०,०००/- रुपयांची मागणी केली आहे. आज रोजी केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे क्र १ याने तक्रारदार यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिट फाॅर ड्युटी सर्टिफिकेट मिळवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष १०,०००/- रुपये एवढी रक्कम स्वीकारली, म्हणून गुन्हा.हॅश व्हॅल्यू घेण्यात आलेली आहे.सापळा पर्यवेक्षण अधिकारीराकेश आ. चौधरीपोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार सापळा अधिकारी:-पोनि/माधवी वाघ

सदर सापळा कार्यवाही व मदत पथक मध्ये पोनि/समाधान वाघ , पोहवा/अमोल मराठे, पोहवा/देवराम गावित, पोहवा/विजय […]