वृत्त प्रतिनीधी- धनंजय गाळणकर
३८ व्या किशोर आणि किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा दिनांक ३० नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर, २०२३ या कालावधीत चिंचणी, पालघर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राचे किशोर व किशोरी असे दोन्ही संघ सहभागी होणार आहेत. राज्य संघटटनेने ३८ व्या किशोर आणि किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेकरिता महाराष्ट्राचे किशोर व किशोरी संघ निवडण्यासाठी श्रीयुत रविकर बागुल (धुळे), यांची निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष व सरचिटणीस ह्या निवड समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. त्यांच्या निवडी बाबत महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व धुळे जिल्हा खो-खो असोशियन सर्व पदाधिकारी तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.
Related Posts
वर्षी येथे अस्तिक मुनी माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी व गुरुजन वर्ग यांचा स्नेह मेळावा संपन्न धुळे…. क्राईम न्यूज ब्युरो सा पोलीस व्हिजन धुळे…. अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित, अस्तिक मुनी माध्यमिक विद्यालय, वर्षी. तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. येथील शाळेत दिनांक..06-11-2024 वार बुधवार रोजी सन 2005 मध्ये शिक्षण घेत यशस्वी झालेले इयत्ता दहावी चे माजी विद्यार्थी यांनी आपल्या शाळेबद्दल व तत्कालीन आपल्याला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचा एकत्र स्नेह मेळावा घेण्याचे भव्य असे नियोजन केले होते. यावेळी विद्यालयाच्या परिसरात मंडप टाकून कार्यक्रमाचे बैठकीवस्था सुंदर करण्यात आली होती. यावेळी विविध जिल्ह्यातून नोकरी निमित्त काम करणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या गुरुजनांच्या प्रति स्नेह भाव दाखवण्यासाठी एकत्रित वर्षी या पवित्र भूमीमध्ये दाखल झाले होती. आपल्या शाळेच्या प्रांगणात आपण इयत्ता पाचवी पासून दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेत असतानाचे अनुभव, आठवणी त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर पुनश्च उमळतांना दिसत होते. पूर्वीचे बालपणाचे मित्र आता वयाने, शरीराने, बुद्धीने, वैचारिक पातळीने खूप मोठे झालेले होते. अशातच 19 वर्षाचा कालखंडानंतर पुनश्च मनोमिलन होण्यासाठी या सर्व मित्रांनी एकत्र येण्यासाठी संघटन बांधण्याचे काम सुरू केले होते. सर्वांचे विचार एकत्र जुडल्यानंतर हा स्नेह मेळावा आपल्या शिक्षण घेतलेल्या शाळेच्या प्रांगणातच घेण्याचे अखेर ठरले. यावेळी जेवणाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली होती. सुरुवातीला अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित अस्तिक मुनी माध्यमिक विद्यालय, वर्षी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या संस्थेचे अध्यक्ष कै. डॉ. अण्णासाहेब सुधाकररावजी बोरसे यांच्या प्रतिमेला वंदन करून त्यांना विनम्र अभिवादन करून,तसेच सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब कैलास सूर्यवंशी हे होते. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्रीमान अशोक बोरसे सर, श्रीमान जे.यु.कंरंकाळ सर, श्रीमान सूर्यकांत बोरसे सर, श्रीमान ढोले सर, श्रीमान आर जे बडगुजर सर, श्रीमान प्रल्हाद साळुंखे सर, श्रीमान एम ए पाटील सर, श्रीमती खैरनार मॅडम, श्री पाटील सर, शिक्षकेतर कर्मचारी श्री.रमेश माळी, चंद्रकांत बडगुजर,श्री ईश्वर पाटील व काही पालक व विद्यार्थीदिनेश गुरव, पुणेमहेंद्र माळी,धुळेरोहित बडगुजर, अमळनेरहर्षल वानखेडे, अमळनेरसागर थोरात ,पुणेदिपक कोळी,सुरतविरेंद्र बडगुजर,वर्षीगणेश चव्हाण,ठाणेपांडुरंग तावडे,भुसावळपंकज गिरासे,मुंबईस्वप्नील बोरसे,पुणेमोहित पाठक, इटलीनिलेश महाले, वर्षीरामचंद्र माळी,नाशिकविलास माळी,वर्षीअंकुश माळी,नाशिकविजय बोरसे, दत्तानेपुरुषोत्तम पाटीलमुक्तार पिंजारी,पुणेअमर बच्चाव, तावखेडाविशाल सुर्यवंशीराहुल बोरसे,दत्तानेघनश्याम माळीयोगेश बोरसे, दत्तानेवंदना बोरसे,धडगावआशा बडगुजर, शिंदखेडागायत्री पाटील, व्यारादिपाली राऊळ,नगरदेवळासंजीवनी ढोले,पालघरज्योती ठाकुर,कविता चौधरी, खेतियामोनाली ढोले,पुणेपुनम बडगुजर,यावल, विजय वाल्हे, व इतर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पुष्प उधळून आपल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रथम स्वागत त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांमध्ये शाळेचे संस्कार शाळेने दिलेले आम्हाला उत्तम शिक्षण शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धती शिक्षकांनी दिलेली शिदोरी यातून आमचे भविष्य घडले अशा पद्धतीने आपापली मनोगते व्यक्त केली. प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपल्या शिक्षकांना आपला प्रत्यक्ष परिचय व आता आपण नेमका कोणता व्यवसाय उद्योग करत आहोत त्याची संपूर्ण माहिती देली. बालपणाच्या कोड आठवणी यांचा उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने माजी विद्यार्थी दिनेश गुरव याने केले. दिनेश गुरव याने आपली ग्राम भाषा अहिराणी तसेच अधून मधून मराठी मध्ये सूत्रसंचालन करून सर्वांची मने जिंकली. माजी विद्यार्थी पांडुरंग तावडे याने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम व आपले सर्व मित्र एकत्र करण्याचे मोठे काम केले. आर्मी मधून सेवानिवृत्त झालेले माजी विद्यार्थी अंकुश माळी याचा यावेळी उपशिक्षक तथा सा पोलीस व्हिजन धुळे चे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आज अंकुश देशाच्या सीमेवर भारतीयांची रक्षा करत होता. त्याचा सार्थ अभिमान आहे. तसेच पोलीस क्राईम ब्रँच मुंबई येथे माजी विद्यार्थी गणेश चव्हाण याने आपण कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन पोलीस भरतीमध्ये कसे भरती झालो आपल्या विचारात त्याने ते व्यक्त केले.माजी विद्यार्थी विजय वाल्हे येणे आपल्या मनोगतात प्रत्येक शिक्षकांनी काय शिक्षण दिले याबद्दल सविस्तर आपल्या मनोगतात विवेचन केले. माजी विद्यार्थिनींमध्ये श्रीमती पूनम बडगुजर ज्या आज यावल येथे ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापिका आहेत त्यांनी आपले विद्यालयाबद्दल जे अनुभव होते ते कथेत केले. त्यानंतर विद्यालयाचे शिक्षक श्रीमान प्रल्हाद साळुंखे यांनी वर्षीही पवित्र कर्मभूमी असून येथे बारा बलुतेदार पद्धतीने सर्व समाज एकत्र गुण्यागोविंदाने राहतो. हे अभय युवा कल्याण केंद्र धुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर अण्णासाहेब सुधाकररावजी बोरसे यांचे जन्मभूमीचे गाव असल्याने त्यांनी आपल्या ग्रामस्थांच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातच आपल्याच गावात शिक्षण घेता यावी यासाठी संस्थेची ही शाखा या ठिकाणी सुरू केली. त्यांचे हे मोठे ऋण आहे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. वर्षी येथील मुलं अतिशय शिस्तप्रिय होते तुम्ही चांगले शिक्षण घेतले त्यामुळे तुम्ही आज यशस्वी झाला आहात आज आमची आठवण पुन्हा तुम्ही केली तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत असे आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांप्रती भाव व्यक्त केला. त्यानंतर उपशिक्षक श्रीमान एम ए पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांप्रती असलेले सर्व अनुभव कथित केले त्यांना एक सुंदर कथा सांगून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. मागील सर्व आठवणींना उजाळा त्यांनी पुनश्च करून दिला. त्यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक श्रीमान अशोक बोरसे सर यांनी आपल्या ग्रामीण भागातून कष्टकऱ्यांची मुले या शाळेत शिकून आज खूप मोठी झाली आम्हाला खूप मोठा आनंद झाला आज तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला हे सोपे नाही आजवर ग्रामीण भागातील मुले संस्कारक्षम जपण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आनंद आहे त्यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. अखेर विद्यालयाला सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडून मोठे घड्याळ सप्रेम भेट देण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी जेवणाचा कार्यक्रम पार पडला.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे… मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके
- Pralhad Salunkhe
- November 7, 2024
- 0
सीआरपीएफ जवान शेखर गवई यांचा अर्ध सैनिक परिवार कल्याण असोसिएशन तर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.
- Pralhad Salunkhe
- October 20, 2024
- 0
धुळे…..सीआरपीएफ जवान शेखर गवई यांच्या कार्याचा लेखाजोखा…….सा.पोलीस व्हिजन, धुळे … जिल्हा अकोला तालुका बाळापूर येथील […]
भारताच्या क्षितीजावरचा ध्रुवतारा निखळला!महान उद्योजक रतन टाटा अनंतात विलीन. धुळे……..सा.पोलीस व्हिजन (क्राईम न्यूज ब्युरो) भारतीय समाजमनात श्रीमंतीविषयी आणि श्रीमंत लोकांविषयी काही कॉम्प्लेक्स आहेत. जसे की, श्रीमंतांना सुखाची झोप येत नाही!, अधिक पैसा कमवून काय करणार!, श्रीमंत माणसं सतत अस्वस्थ असतात, त्यांच्या घरची पोरेबाळे अधू अपंग असतात(!), ते सतत कसल्या तरी भीतीने ग्रासलेले असतात, श्रीमंती हराम कमाईमधून येते(!), श्रीमंती वाईट नाद शिकवते, श्रीमंतांना मिजास असते ते माजोरडे असतात(!), त्यांची सुखे पोकळ असतात(!) आणि शेवटचे म्हणजे श्रीमंतांना माणुसकी नसते! आणखीही काही ऍडिशन यात करता येतील. एकंदर भारतीय माणसाला श्रीमंतीविषयी असूया असते मात्र तो ती व्यक्त करत नाही. केवळ चडफडत राहतो, आपली गरिबी त्यांच्या श्रीमंतीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे याची अकारण तुलना तो करत राहतो! पैसेवाला म्हणजे माजलेला असे एक सूत्र आपल्याकडे रुजलेले आहे अर्थातच ही सर्व सूत्रे गृहीतके रुजण्यामागे काही श्रीमंत व्यक्तींची वर्तणूकदेखील कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. जागतिक दर्जाच्या श्रीमंत व्यक्तींविषयी आपल्याकडे सातत्याने बोललं जातं. त्यात गॉसिप असतं नि दुस्वासही असतो. अनेक मोठमोठी नावे या संदर्भात घेता येतील. मात्र एक अख्खं घराणं यास अपवाद आहे आणि त्या घराण्यातला एक हिमालयाएव्हढा माणूस तर अतिव अपवाद मानला जाईल ते म्हणजे रतन टाटा! काल त्यांचे देहावसान झाले!
- Pralhad Salunkhe
- October 10, 2024
- 0
टाटांचं मीठ खाल्लं नि त्यांची बाटाची चप्पल घातली इथून सामान्य माणूस त्यांच्याशी जोडला जातो! मुळात […]