धुळे….सा.पोलीस व्हिजन, धुळे….३० नोव्हे- धुळे शहरातील सांप्रदायीक एकता आणि समानतासाठी आग्रही असणारा संघ “सर्व धर्म संघाच्या” वतीने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. नमूद उपक्रमात बहु भाषीय काव्य संमेलन, विद्वानांचे व्याख्यान, सांप्रदायीक सहविचार सभा आणि विवीध वैचारिक बैठकांचे आयोजन संघाच्या वतीने करण्यात येत असते. रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी संदेश भुमी येथे “सर्व धर्म संघाच्या” वतीने संघाचे जेष्ठ सदस्य श्रीमान हाजी अक्रीम अब्दूल न्हावकर यांच्या अध्यक्षतेत आणि संघाचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत डॉ.पापालाल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, श्रीयुत प्रा. राजीव आरके यांचे संविधान विषयावर महत्वपुर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस संघाचे अध्यक्ष डॉ.पापालाल पवार यांनी प्रास्तविकात “सर्व धर्माची प्रार्थना” सादर करून प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला, व घटनाकारांच्या संविधानाने देशातील सर्व धर्मीयांना सत्कर्मासाठी उद्युक्त केले आहे, असे व्याख्यान सभेच्या प्रास्ताविकात डॉ.पापालाल पवार यांनी विषद केले. जगातील एकमेव बहु धर्मीय असलेल्या भारत देशाचे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले भारतीय संविधान हे जगातील एकमेव सर्वोत्तम राज्य घटना आहे. जगातील जे जे सर्वोत्तम आहे. ते ते सर्व एकत्र करून तयार झालेला गुलदस्ता म्हणजे भारतीय संविधान होय. भारत देशात धर्मवादाला थारा जरी नसला तरी प्रत्येक धर्माला संविधानाने समान स्वातंत्र्य दिलेले आहे. भारतातील प्रत्येक धर्म घटनाकार डॉ.बाबासाहेबांनी संविधानाच्या सुत्रात गुंफलेला असल्याने, देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्चाहत्तरी नंतरही ईथे सर्व धर्म गुण्या गोविंदात एकत्र आहेत.भारतीय लोकशाही ही “सार्वोभौम स्वतंत्र बलशाली लोकशाही” असा जगात भारताच्या लोकशाहीचा लौकीक आहे,आणि हे घटनाकारांनी निर्माण केलेल्या संविधाना मुळेच शक्य झाले आहे. अशा अभ्यासपुर्ण वैचारीक सहज सोप्या शब्दात व्याख्याते श्रीयुत प्रा. राजीव आरके यांनी संविधानाची माहीती उपस्थित श्रोत्यांना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कविवर्य आप्पासाहेब दत्तात्रय कल्याणकर यांनी केले, तर डॉ.श्रीकृष्ण बेडसे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकरदादा खंडारे, कॉम्रेड एल.आर. राव, प्रा. डॉ.गोपाळ निंबाळकर, प्रदिप बच्छाव, अविनाशभाई पाटील, धनंजय गाळणकर, छोटुलाल मोरे, रमेश शिरसाठ, योगेश बागुल, रणजित शिंदे, सुरेश थोरात(प्रवाशी पत्रकार तथा शोध लेखक), अशोक बागुल आदींनी व्याख्यान आयोजन प्रसंगी परीश्रम घेतले.
