साक्री दरोडा प्रकरणातील मास्टर माईंड अखेर निशा शेवाळेच… दरोड्याचा कट रचला निशाने !

साक्री दरोडा प्रकरणातील मास्टर माईंड अखेर निशा शेवाळेच… दरोड्याचा कट रचला निशाने !

धुळे..( प्रतिभा प्र साळुंके साप्ताहिक पोलीस विजन क्राईम न्यूज ब्युरो)- सध्या तरुण मुलं आणि मुली त्यांच्या सुखासाठी आई वडील परिवार याचा कोणताही विचार करत नाहीत अशी परिस्थिती समाजाच्या प्रत्येक घटकांमध्ये विविध घटनांच्या घडत आहेत त्यातून दिसून येत दरोडा पडणे या घटना जरी आपण पाहिल्या आहेत परंतु साक्री येथील सरस्वती नगर मधील हा दरोड्याचा गुन्हा दाखल झाला त्यात विशेष असे होते की दरोडेखोरांनी मुलीला देखील पळून नेले. शक्यतो दरोडेखोर असो की चोर असो हे फक्त मुद्देमाल आणि पैसे घेऊन फरार होतात. आजवर हा इतिहास आहे. म्हणून साखरी मधील दरोडेखोरांनी तरुण 24 वर्षीय मुलीला पळवून नेले ही बाब कुणाच्याही मनाला पटलेली नव्हती हे आता जवळजवळ पोलीस तपासातून सुद्धा निष्पन्न झालेले आहे. मुलीच्या व तिच्या मित्रांकडून केलेला बनाव या संपूर्ण तपास घटनेतून आज उघडकीस आलेला आहे. साक्री पोलिसांनी दाखवलेला समय सूचकतेचा परिणाम नक्कीच या घटनेला तातडीने उघडकीस आणण्यामध्ये यश मिळवले आहे. मध्यप्रदेश पोलिसांचे देखील कौतुक आहे. तात्काळ छडा लावून साखरी व मध्य प्रदेश पोलिसांनी आपली वर्दी आणि त्याचा धाक आरोपींना दाखवून आज या संपूर्ण घडलेल्या घटनेचा फर्दा फास केला पोलिसांच्या कामगिरीला साप्ताहिक पोलीस व्हिजनच्या वतीने सलाम सलाम सलाम!!! घडलेली घटना अशी संपूर्ण धुळे जिल्हा हादरून सोडणा-या साक्री दरोडा प्रकरणी उकल झालेली असून गत २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता साक्री शहरातील विमलाबाई महाविद्यालया जवळील निलेश पाटील यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्यातील मास्टर माईंड दुसरा तिसरा कुणी नसून दस्तुरखुद्द पाटील यांची भाची हिच असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसानी केलेल्या सखोल तपासा दरम्यान या घटनेचा संपूर्ण तपशील समोर आला आहे साक्री दरोडा प्रकरणी प्रियकरा सोबत फसला निशा शेवाळेचा डाव या गुन्ह्यातील आरोपी विनोद भरत नाशिककर हा मुळचा शाजापूर जि.शाजापूर मध्य प्रदेश हा असून तो गेल्या दोन वर्षा अगोदर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सौर उर्जा ठेकेदार म्हणून कामास होता. या कालावधीत विनोद भरत नाशिककर हा धुळे येथील आदर्शनगर मध्ये निशा शेवाळे हीच्या घराशेजारी वास्तव्यास होता.त्यानतर भरत नाशिककर हा आपल्या मुळं गावी शाजापूर जि शाजापूर मध्यप्रदेश येथे परत निघून गेला मात्र निशा शेवाळे व विनोद नाशिककर हे नियमित इंस्टाग्राम ॲपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते निशा शेवाळे हिस प्रियकर विनोद नाशिककर यांच्या समवेत पळून जायचे असल्याने हे सगळे कट कारस्थान निशा हिनेच विनोद नाशिककर यांच्या संगनमताने रचून विनोद नाशिककर याने आपले काही हरियाणा राज्यातील मित्र बोलावून घेत दिनांक २५ नोव्हेंबर रोजी साक्री शहरात दरोडा घातला.यात ज्योत्स्ना निलेश पाटील यांच्या घरातून सुमारे ८८ हजाराचा मुद्देमाल विनोद नाशिककर व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरुन नेला.या दरोड्याचा सखोल तपास साक्री पोलिसांनी करून या दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.पुढील तपास साक्री पोलिस करीत आहेत.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे ✒️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *