साक्री शहरातील धाडसी चोरीसह अपहरण झालेल्या तरुणीला शोधण्यात साक्री पोलीस स्टेशनला मिळाले यश साक्री पोलीस व मध्य प्रदेश पोलीसांच्या वर्दीला सलाम !!

धुळे :- सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो..दरोडाटाकणे व त्या घरातुन तरुण मुलीला ही किडन्याप केल्याची भयानक घटना साक्री येथे घडली.सविस्तर घडलेला प्रकार असा की,काल साक्री शहर येथील अत्यंत रुदय हेलावून टाकणारी घटना घडली श्री शेवाळे यांच्या राहत्या घरी चोरांनी धाडसी चोरी करत एका 23 वर्षे युवती चे अपहरण करून सोबत काही रोकड व दागिने यांची ही चोरी करण्यात आली.काल सकाळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता साक्री पोलीस स्टेशनचे पी.आय.श्री निकम साहेब यांनी आपल्या सर्व टीमला घेऊन घटनास्थळी दाखल झाले व तपासला गती दिली तसेच धुळे येथील नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे साहेब यांनीही घटनेची दखल घेत सर्व तपास यंत्रणेला कामाला लावले.त्यानंतर 24 तासाच्या आत म्हणजेच आज सकाळी सदर तरुणी ही पोलिसांना मध्यप्रदेश येथील सेंधवा येथे आढळून आली त्यानंतर साक्री पोलीस स्टेशनची एक टीम त्या तरुणीला घेण्यासाठी मध्य प्रदेशातील सेंधवा येथे पाठवण्यात आली व त्या मुलीला आपल्या घरी सुरक्षित पोहोचवण्यात पोलिसांना यश आले.

सर्व पोलीस स्टेशन साक्री चे कर्मचारी आणि धुळे पोलीस दलाच्या गुप्तचर यंत्रणांनेचे मनापासून धन्यवाद
मात्र चोरांचा तपास अजून पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे लवकरच पोलीस यंत्रणेला या चोरांना पकडण्यात देखील यश येईल असे साक्री तालुक्यातील सर्वसामान्य म्हणून बोलले जात आहे या सदर घटनेमधून सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे कुठल्याही संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे जागरूक नागरिकांचे देखील काम आहे पोलीस यंत्रणेला देखील नागरिकांनी सहकार्य करावे असे पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात आले.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *