
धुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलीसांना दिवाळी निमित्त सा पोलीस व्हिजन धुळे तर्फे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंके यांनी दिल्या शुभेच्छा🍁🍁🌹🌹🌹🖊️🖊️🖊️🖊️ धुळे…. पोलीस म्हटलं की त्यांना 24 तास आपल्या कर्तव्य काळात सण असो की इतर बंदोबस्त सतत परीवारापासून आपला आनंद हिरावून सामान्य नागरिकांचे सुरक्षेसाठी तैनात राहावे लागते.या आपल्या पोलीस बांधवांना महत्त्व पुर्ण सण दिवाळी मध्ये देखील आपल्या नोकरीत कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज राहावे लागते.म्हणुन या अशा पोलीस बांधवांची ही दिवाळी आपल्या नेमून दिलेल्या स्पॉटवर प्रत्यक्ष थांबून वाहतूक नियंत्रण करण्याचे काम धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस बांधव करत असतात. धुळे शहरातील मुख्य गोपाल टी जवळील सिग्नल जवळ प्रचंड गर्दी असते. दिवाळी सणामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते ती सोडवून नागरिकांना वाहतुकीसाठी सोय व्हावी यासाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाने सदैव हे आपले कर्तव्य बजावणारे पोलीस कॉन्स्टेबल श्री मनोहर (रावसाहेब) महाले,पो.काँ. महेश सूर्यवंशी, पो काँ.मनोज बोरसे,पो.काँ. अजय पाटील, पो काँ.विनोद पाटील, हे सर्व धुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखा कर्मचारी यांना साप्ताहिक पोलीस व्हिजनचे मुख्य संपादक प्रल्हाद साळुंखे यांनी दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच या सर्व पोलिसांनी चिरंजीव यश साळुंखे याची झी 24 तास मीडिया मुंबई येथे परमनंट जॉब झाल्याने त्याला धुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने पोलिसांच्या वतीने त्याचे हार्दिक स्वागत करण्यात आले व त्यास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. साप्ताहिक पोलीस व्हिजन व झी मीडिया, मुंबई वतीने या सर्व पोलिसांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिसांना या गोष्टीचा अभिमान वाटला आणि त्यांनी साप्ताहिक पोलीस व्हिजन व झी मीडिया 24 तास मुंबई चे आभार व्यक्त केले*
