मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक!! धनगर समाजाने ही दिला पाठींबा जरांगे पाटील म्हणाले मुख्य मंत्री, उपमुख्यमंत्री का म्हणाले दोन दिवसात देतो आरक्षण??मराठा पाठोपाठ धनगर समाजही आक्रमक सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी करण्याची सुरुवात?✍️✍️✍सा पोलीस व्हिजन न्युज मिडिया……… सध्या महाराष्ट्र राज्यात मराठा आणि धनगर समाजाचा आरक्षण मुद्दा ज्वलंत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले असुन त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तर गावोगावी मराठा समाज आरक्षण मिळत नाही म्हणून आक्रमक होऊन सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी केली आहे तसे बॅनर गावागावात दिसू लागलेत राजकीय पक्षाचे नेते गावात आले तर त्यांना खडे बोल सुनवतात मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय गावात प्रवेश मिळणार नाही मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पाठोपाठ धनगर समाज ही आक्रमक होत आहे धनगर समाजानेही सर्व पक्षीय नेत्यांना गावात प्रवेश नाकारत आहेत. तसेच बॅनर बाजी धनगर समाजही करु लागला आहे यामुळे महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठा समाजाने आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी केली असून तर धनगर समाजाने पश्चिम महाराष्ट्रात गाव बंदीची घोषणा करुन सुरुवात केली आहे. मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावण भूमीतून मराठा आणि धनगरांचे दुखणे एकच आहे. धनगर समाजाला घटनेतच आरक्षण मिळाले आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी धनगड आणि धनगर अशी दुरुस्ती करुन र चा ड असा फरक झाल्यामुळे ७० वर्षे झाले तरी न्याय मिळत नाही. हेच दुर्दैव आहे राज्यकर्ते शासन निर्णय घेणार नसेल तर राज्यात मराठा समाज एक नंबर आहे तर धनगर समाजही दोन नंबर वरती आहे मराठा आणि धनगर समाज जर एकत्र आला तर आरक्षण मिळेल परंतु आरक्षण मागणारे नाही तर देणारे होतील त्यामुळे सरकारने जास्त वेळ न घेता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण लागू करावे…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *