धुळे जि. प. शिक्षण अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक लाच स्वीकारताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात.तक्रारदार शिक्षकाच्या हिंम्मतीला सलाम!!

धुळे – शिक्षक म्हटलं की कुणी ही त्याला जस वाकवायच तसं वाकवण्याच काम काही अधिकारी, प्रशासन, काही मुख्याध्यापक, समाजातील काही घटक,करत असतात.शिक्षकांचे शोषण खुप केले जाते. त्याला विविध प्रकारे छळवाद करून माणसिक त्रास दिला जातो.मात्र नाईलाजाने त्याला कधी कोर्टात, संघटनेकडे,तर कधी शिक्षण अधिकारी कार्यालय येथे न्याय मिळवून घेण्यासाठी जावे लागते. मात्र त्याला न्याय मिळत नाही. त्याचे मुख्य कारण आपल्याला काहीतरी चिरीमिरी मिळायला पाहिजे तरच यांचे काम होऊ द्यायचे अन्यथा नाही.यातुनच काही या विभागातील कर्मचारी अशा शिक्षकांवर खोटं कुभांड रचुन न्याय मागण्यासाठी आलेल्या शिक्षकालाच बदनाम करण्याचे कुटील कारस्थान काही चमकोगिरी करणारे त्यांचे दलाल त्यांना साथ देत असतात.पण सत्य हे अखेर सत्य असतं. काही अधिकारी लाजलुचपत प्रतिबंध कायद्यामध्ये अडकून जेल भोगुन आले मात्र तरी त्यांची हाव सुटायला तयार नाही. ते पुन्हा चरण्यासाठी तयारच असतात.असाच प्रकार धुळे येथे घडला.तो असा की, जि. प. शिक्षण अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक लाच स्वीकारताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकले असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई नंतर एकच खळ बळ माजली होती.

राकेश दिनकर साळुंखे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, धुळे व विजय गोरख पाटील, वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, धुळे यांनी तक्रारदार यांचे कडून एकूण 91,000 हजार रु लाचेची मागणी करुन त्यापैकी 35,000/-रु पहिला हप्पा स्विकारतानां रंगेहाथ पकडल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तकारदार हे जिल्हा परिषद शाळा, रामपुरा ता. शिरपूर, जि. धुळे येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत त्याची पेसा मधुन नॉनपेसा मध्ये बदली होणेकरीता, मा उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद कडून आदेश पारित झाले होते त्या अनुषंगाने तकारदार यांनी मा मुख्य कार्यकारी / अधिकारी, जि. प. धुळे यांचेकडे बदली होणेकरीता विनंती अर्ज सादर केला होता. त्यावर मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी “सहानभूतीपुर्वक विचार करावा” असा शेरा मारुन सदरबाब अर्ज पुढील कार्यवाहीस्तव श्री राकेश सांळुखे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे कडे पाठविला होता.

त्यानंतर तकारदार हे वेळोवेळी शिक्षणाधिकारी राकेश सांळुके यांची भेट घेवून त्याच्या बदली अर्जावर कार्यवाही करण्याकरीता, पाठपुरावा करीत होते त्या दरम्यान शिक्षणाधिकारी सांळुके यांनी तक्रारदार यांचे कडे त्यांचा बदली अर्ज शिफारशीसह मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे पाठविण्यासाठी २५,०००/-रु लाचेची मागणी केली होती. तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक विजय पाटील यांनी तक्रारदार यांच्या बदली अर्जावरुन मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून बदली आदेश मिळवून देण्यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), श्री महाले कार्यालयीन अधिक्षक (सा.प्र.), पराग धात्रक, शिक्षक व इतर कार्यालयीन कर्मचारी यांचेकरीता ६६.०००/-रु लाचेची मागणी केल्याची ला.प्र. विभाग, धुळे कार्यालयाकडे तकार दिली होती.

सदर तकारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता, शिक्षणाधिकारी राकेश सांळुखे (प्राथमिक) यांनी तकारदार यांचेकडे २५,०००/-रु लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २०,०००/-रु मागणी करुन वरिष्ठ सहायक विजय पाटील यांना भेटण्यास सांगितले. तसेच वरिष्ठ सहायक विजय पाटील यानी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), श्री. महाले, कार्यालयीन अधिक्षक (सा.प्र.), व इतर कार्यालयीन कर्मचारी यांचेकरीता ६६,०००/-रु पंचासमक्ष लाचेची मागणी करुन तडजोडीअती ५१,०००/-रु लाच स्विकारण्याचे मान्य करुन पहिला हप्ता ३५,०००/-रु स्विकारताना त्यांना रगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुध्द धुळे शहर पोस्टे जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री अभिषेक पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश आहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, प्रविण पाटील, मुधीर मोरे, जगदिश बडगुजर या पथकाने केली आहे

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा शर्मिष्ठा बालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा श्री माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.असे तपास अधिकारी यांनी सा पोलीस व्हिजन यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *