सेवापूर्ती निमित्त आहे,मात्र खऱ्या अर्थाने आपले कर्तव्य बजावत अखेरपर्यंत सुखरूप नोकरी पूर्ण करून जो सेवानिवृत्त होतो तो खरा भाग्यवान 🌹🌹🌹🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 आबासाहेब आढावे एन बी पर्यवेक्षक सेवानिवृत्त होत आहेत त्यांना शुभेच्छा व अभिनंदन साठी खास मनोगतखास आमच्या सर्वांवर प्रेम करणारे सदाबहार व्यक्तिमत्व माननीय पर्यवेक्षक आबासाहेब नरेंद्र भटू आढावे सर, जे आमच्या अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित अभय माध्यमिक व उच्च माध्यमिक किमान कौशल्य विभाग, धुळे येथील कर्मचारी आज दिनांक..31-10-2023 रोजी आपल्या मोठ्या पल्याची नोकरी पुर्ण करत वयानुरूप आपल्या नोकरी मधुन सेवानिवृत्त होत आहेत.आजचा हा त्यांचा दिवस आनंदाचा व मागिल सर्व आठवणी डोळ्यासमोर पुन्हा स्मरण करून केलेले कार्याचा सतत स्मरण करून पुढील उरलेले आयुष्य आपल्या परीवार साठी जगण्यासाठी मोकळे झाले आहेत. एरवी आबासाहेब आढावे सर यांना आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष कै. डॉक्टर अण्णासाहेब सुधाकर जी बोरसे यांनी जीवापार प्रेम करून संस्थेत नोकरी दिली 1992 पासून विनाअनुदान संस्थेवर ग्रामीण भागातील रानमळा तालुका जिल्हा धुळे येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून अण्णा साहेबांनी प्रेमाने त्यांना ही नोकरी दिली. पूर्वीपासून भोळे भाबडे स्वभावाचे आबासाहेब हे मुख्याध्यापक तर झालेच पण अण्णा साहेबांचा विश्वासाला तडा जाऊ दिला नाही असे चाकोरीबद्ध चालण्याचा त्यांनी अथक प्रयत्न केला. मात्र भोळ्या स्वभावाचे आबांचे या नात्या कारणाने कुणीतरी या ना त्या चुगल्या लावून आबासाहेब नरेंद्र आढावे यांना खाली खेचण्याचे प्रयत्न होत गेले. याच कारणाने आबासाहेब यांना राजीव गांधी येथे धुळे शहरात मुख्याध्यापक म्हणून बदली केली गेली तेथील शहरातील प्रशासन चालवण्यासाठी कठीण असल्याने बाबासाहेबांना अखेर तुम्हाला ते पेलवणार नाही.असे सांगत थेट रिव्हर्शन घेण्याची अट घालून त्यांना अभय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धुळे येथे पर्यवेक्षक पदावर आणण्यात आले. वास्तविक अण्णासाहेबांचे अतिशय प्रेम या व्यक्तीवर होते. पण चांगल्या कामात, चांगल्या व्यक्तींना नेहमी ब्रेक ज्याला आपण धावत्या गाडीच्या चाकाला वट लावणे म्हणतो तो प्रकार आढावे आबांच्या च्या बाबतीत इतर व्यक्तिंकडुन केले गेले.एखादी छोटी शाळा ते मुख्याध्यापक म्हणून सहज सांभाळुन घेऊन जाणारे ही होते.पण इतरांनी ते होऊ दिलं नाही. मात्र मनापासून डॉक्टर अण्णासाहेब व डॉ ताईसाहेब हे आढावे सरांवर सतत प्रेम करणारे व्यक्तिमत्व ठरले. त्यांचा यात दोष नव्हता हे आढावे सरांनी अनुभव ले होते.त्यांनी तेव्हापासून पर्यवेक्षक पदाची धुरा आनंदाने स्वीकारली ती फक्त आणि फक्त आपल्या हृदयात असलेले डॉक्टर अण्णासाहेब यांच्या प्रेमापोटी. कारण त्यांना माहीत होते त्यांचे जे नुकसान झाले ते इतरांनी केले होते. पण यातही ते सदैव आनंदाने आपली नोकरी करत असताना आपल्या विनोदी स्वभावातून कितीही संकट असो टेन्शन असो ते अगदी विनोदी याच्यातून सोडवत आजचा दिवस आनंदी कसा होईल अशा पद्धतीने आपली नोकरी करणारा एक चांगला शिक्षक म्हणजेच आबासाहेब आढावे सर होत. कुणी रागावले तरी सहन करून घेणारे आढावे आबा,राग त्यांनी कुणाचाही मानला नाही. आणि झालेल्या नुकसानीची खंतही केली नाही. स्वतःला डायबिटीज असूनही टेन्शन सहज जिरवणारा व्यक्ती म्हणजे आढावे सर, रोजची दैनंदिनी लिहिणे ऑनलाईन शालेय पोषण आहार नोंदणी करणे, रजेवरील शिक्षकांचे बुलेटीन लावणे, वर्गावर कुणी नसेल तर स्वतः जाऊन थांबणे, विशेष म्हणजे आपले स्वतःचे तास स्वतः घेणे, आणि कंटाळा आला तर सरळ पिटीचा तास म्हणून ग्राउंडवर मुलांना आणणं ही आबांची हातोटी होती. आपल्या शाळेतील शिक्षकांना नेहमी प्रेमाने बोलणे आणि हसत खेळत भाऊ दादा म्हणून काम करून घेण्याचा प्रयत्न करणे मुख्याध्यापक यांची जी जबाबदारी असते ती हलकी करण्याचा प्रयत्न पर्यवेक्षक या नात्याने आबासाहेब करून घेत होते. चांगल्या कामाची थाप शिक्षकांच्या पाठीवर देण्याचं काम आढावे सर करत होते. जे खरं असेल त्याला खरं म्हणणं हे धैर्य त्यांच्यामध्ये मी स्वतः पाहिलेले आहे. आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांना आवर्जून सांगत होते. आपल्या कुटुंबापेक्षा शाळा हेच माझे खरे कुटुंब आहे असे म्हणणारे आबा मी अनुभवले आहेत. संस्थेविषयी प्रेम संस्थाचालक यांच्या विषयी आदर, चांगल्या शिक्षकांच्या बाबतीत सदैव मोठेपणा दाखवून त्यांचा आदर करणारे व्यक्तिमत्व आबा हे मी अनुभवले आहेत. शाळा ही चांगली केव्हा राहते!! ज्या शाळेत मुख्याध्यापक पारखी नजरेचा कोणत्या कामाचा कोणता शिक्षक आहे त्याचा अभ्यास करून त्यांना त्या पद्धतीने शाळेची प्रगतीसाठी वापर करून घेणे हे ज्याला जमते तो खरा मुख्यध्यापक. आपण स्वतः करतो आणि मग दुसऱ्याला सांगतो तर समोरचा व्यक्ती काम ऐकतोच हे आढावे सर यांचे कडुन शिकायला मिळालं. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक म्हणून नव्हे तर त्यांचे पालक म्हणून आढावे सर सदैव विद्यार्थ्यांना प्रेम करत होते. डायबिटीज मुळे एखाद्या वेळेस चिडचिडपणा देखील आबांचा होत असे त्यातून एखाद्या विद्यार्थ्याने कुणाचे नाव घेतले आणि ती तक्रार आबांकडे आली तर त्याला हमखास शिक्षा करण्याचे धाडस आबांकडे होते.ताईसाहेब आणि आण्णासाहेब, दादासाहेब अभय बोरसे, ताईसाहेब माधुरी ताई यांना कायम श्रध्दास्थान म्हणून पहाणारे आढावे सर यांना मी पाहिले आहे.तात्यासाहेब बी एम पाटील यांच्या करवी सुचनांचे पालन देखील करणारे आढावे आबा आज जरी सेवानिवृत्त होत आहेत तरी त्यांची ओळख व आठवणी सदैव अभय युवा कल्याण केंद्र धुळे संस्था परीवार मध्ये कायम तेवत राहणार आहे. आठवण नेमकी कुणाची ठेवतात!!! ज्यांनी ज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांवर उदार प्रेम केले त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यांच्यातील कौशल्य गुण समजून घेतले आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे सदैव स्मरणात राहतात. आणि सेवानिवृत्तीनंतर आपण तेच खरे कमावलेले धन असते. पैसा कोणीही कमावतो पण माणूस कसा होता, कसा जगला, का जगला, कुणासाठी जगला, कुणाला किती उपयोगात आला. स्वतःचे निर्णय सक्षम घेणारा व्यक्ती हा सदैव समाज व आपल्या मित्रपरिवार आप्तेष्ट यांच्या मनात कायमस्वरूपी ठसलेला असतो.कै. अण्णासाहेब डॉक्टर सुधाकर बोरसे हे अतिशय पारखी नजरेचे व्यक्तिमत्व अपार स्मरणशक्ती आणि कौशल्य असलेल्या व्यक्तीचे सतत गुणगान करणारे, व पाठ थोपटून आशिर्वाद देणारे महान विभूती आपल्या अभय युवा कल्याण केंद्र धुळे संस्था अध्यक्ष म्हणून सदैव हृदयात राहतीलत राहुन पुढे अतिशय प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय ताईसाहेब डॉ शालिनीताई बोरसे यांनी खऱ्या कलात्मक व कौशल्य पूर्ण आपल्या कर्मचारींवर मातृत्व प्रेम केलेले आहे ते कदापि आपण कुणीही विसरू शकत नाही आणि या चांगल्या परिवारातील संस्थाप्रमुखांच्या शुभ आशीर्वाद खाली आज ज्यांनी ज्यांनी नोकरी केली आणि आज सेवानिवृत्त होत आहेत ते सर्व भाग्यशाली म्हणावे लागतील.आज शिक्षकेतर कर्मचारी महिला वर्गातून अजून एक महिला व्यक्तिमत्व सेवानिवृत्त होत आहेत श्रीमती ज्योती सोनारताई यांनी अखेर पर्यंत माननीय डॉक्टर अण्णासाहेब व ताईसाहेब व संपूर्ण बोरसे कुटुंब यांचे सर्व कौटुंबिक भोजन असो की इतर कामे आजवर प्रामाणिकपणे केली आहेत त्यांची सेवानिवृत्ती आज झाली आहे त्यांना देखील सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.व पुढील वाटचालीस सर्व सेवानिवृत्त आपल्या अभय परिवारातील प्रत्येक घटकाला हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटी जावो आरोग्य उत्तम राहो या शुभेच्छा देतो*🌹🌹🌹🌹🌹✒️✒️✒️ *प्रल्हाद साळुंके मुख्य संपादक सा पोलीस व्हिजन धुळे *

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आक्रमक!! धनगर समाजाने ही दिला पाठींबा जरांगे पाटील म्हणाले मुख्य मंत्री, उपमुख्यमंत्री का म्हणाले दोन दिवसात देतो आरक्षण??मराठा पाठोपाठ धनगर समाजही आक्रमक सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी करण्याची सुरुवात?✍️✍️✍सा पोलीस व्हिजन न्युज मिडिया……… सध्या महाराष्ट्र राज्यात मराठा आणि धनगर समाजाचा आरक्षण मुद्दा ज्वलंत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले असुन त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तर गावोगावी मराठा समाज आरक्षण मिळत नाही म्हणून आक्रमक होऊन सर्व पक्षीय नेत्यांना गाव बंदी केली आहे तसे बॅनर गावागावात दिसू लागलेत राजकीय पक्षाचे नेते गावात आले तर त्यांना खडे बोल सुनवतात मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय गावात प्रवेश मिळणार नाही मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पाठोपाठ धनगर समाज ही आक्रमक होत आहे धनगर समाजानेही सर्व पक्षीय नेत्यांना गावात प्रवेश नाकारत आहेत. तसेच बॅनर बाजी धनगर समाजही करु लागला आहे यामुळे महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठा समाजाने आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी केली असून तर धनगर समाजाने पश्चिम महाराष्ट्रात गाव बंदीची घोषणा करुन सुरुवात केली आहे. मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावण भूमीतून मराठा आणि धनगरांचे दुखणे एकच आहे. धनगर समाजाला घटनेतच आरक्षण मिळाले आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी धनगड आणि धनगर अशी दुरुस्ती करुन र चा ड असा फरक झाल्यामुळे ७० वर्षे झाले तरी न्याय मिळत नाही. हेच दुर्दैव आहे राज्यकर्ते शासन निर्णय घेणार नसेल तर राज्यात मराठा समाज एक नंबर आहे तर धनगर समाजही दोन नंबर वरती आहे मराठा आणि धनगर समाज जर एकत्र आला तर आरक्षण मिळेल परंतु आरक्षण मागणारे नाही तर देणारे होतील त्यामुळे सरकारने जास्त वेळ न घेता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण लागू करावे…..

सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळांना प्रश्न संच वाटप गट साधन केंद्र सुंदरदे ता जि नंदुरबार येथील केंद्रातील शाळांना शासनाच्या संकलित चाचणी परीक्षा प्रश्नसंच संपूर्ण सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळांना प्रत्यक्ष प्रश्न संच वाटप सुंदरदे केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख बापुसाहेब देसले सो.यांनी अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे ता जि नंदुरबार येथील मुख्याध्यापक बापूसाहेब कैलास आर सुर्यवंशी सर,श्राफ संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक बापूसाहेब मिलींद माळी,सोबत सह शिक्षक श्री धनगर सर यांना प्रश्न संच वाटप करताना दिसत आहेत.शुक्रवार दिनांक.27-10-2023 रोजी सुंदरदे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत जिल्हा परिषद नंदुरबार शालेय शिक्षण विभाग व्दारा शिक्षकांसाठी शिक्षक परीषद चे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सुंदरदे केंद्रातील एकोणावीस शाळा या शिक्षक परीषद साठी उपस्थित होते.शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ व्यक्ती साधन उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांनी उपस्थित शिक्षकांना दुपारच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय उत्कृष्ट केली होती.सदर संकलित चाचणी परीक्षा सोमवार दिनांक..30-10-2023 ते 1-11-2023 पर्यंत होणार आहेत. विद्यार्थ्यांनी यावेळी आपली उपस्थिती 100% ठेवण्याचे शासनाचे धोरण आहे.भाषा, गणित, इंग्रजी या मुख्य तीन विषयांच्या या परीक्षा होणार सोबतच नियमित प्रथम सत्र परीक्षा देखील विद्यार्थ्यांनी द्यायचीच आहे असे केंद्र प्रमुख बापूसाहेब देसले यांनी या वेळी मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे.🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️सा पोलीस व्हिजन धुळे

धुळे जि. प. शिक्षण अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक लाच स्वीकारताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात.तक्रारदार शिक्षकाच्या हिंम्मतीला सलाम!!

धुळे – शिक्षक म्हटलं की कुणी ही त्याला जस वाकवायच तसं वाकवण्याच काम काही अधिकारी, […]

सा पोलीस व्हिजन धुळे क्राईम… दिड वर्षांपूर्वी हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधून काढला, चार महिन्यांत 36 मोबाईलचा शोध

दिड वर्षांपूर्वी हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधून काढला, चार महिन्यांत 36 मोबाईलचा शोध दिड वर्षांपूर्वी हरवलेला […]

कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी—————-

पिंपळनेर….. प्रतिनिधी सा पोलीस व्हिजन धुळे…कर्म.आ.मा.पाटील, कला, वाणिज्य व कै विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी […]

कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात स्वच्छताही सेवा अंतर्गत पिंपळनेर पोलीस्टेशन येथे श्रमदान.—-‐—————————————कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना या एककाने पिंपळनेर पोलिस्टेशन येथे पोलिस्टेशन च्या आवारातील केरकच-याची 1तास साफसफाई केली.प्रारंभी प्रभारी प्राचार्य के.डी.कदम यांनी रॅलीचे श्रीफळ वाढवून उद्घाटन केले.स्वच्छतेवर घोषणा देत रॅली पिंपळनेर पोलिस्टेशन ला गेली.तेथे पोलिस मित्रांसोबत एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांनी आवारातील साफसफाई केली.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा.एल.जे.गवळी व विद्यार्थ्यांनी पोलीसांच्या जीवन कार्या बदल एक गीत सादर केले.पिंपळनेर पोलिस्टेशनचे पी.एस.आय.मा.पारधी साहेब यांनी मनोगत व्यक्त करतांना स्वच्छता असली तर आपले आरोग्यतंदुरुस्त राहते.बाह्य स्वच्छता जेवढी महत्वाची तेवढीच आंतरीक स्वच्छता देखील महत्त्वाची असते.प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले घर,आपले अंगण,आपला परिसर,आपली गल्ली,आपले महाविद्यालय,आपले गाव व आपली नदी कसे स्वच्छ राहील यासाठी कटिबद्ध असायला हवे.आपोआप स्वच्छता राखली जाऊन संपूर्ण भारत स्वच्छ होईलअसे मत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास मा.पी.एस.आय श्री.पारधी साहेब, प्राचार्य श्री.के.डी.कदम सर, पत्रकार श्री.सुभाष जगताप,सर्व पोलीस बंधु,होमगार्ड बंधु भगिनी व महाविद्यालयातील डाॅ.बी.सी.मोरे,डाॅ.एन.बी.सोनवणे,प्रा.सी.एन.घरटे,डाॅ.खरात ए.जी. प्रा.डी.बी.जाधव,प्रा.डाॅ.वाय.एम.नांद्रे प्रा.सी.एन.घरटे,प्रा.पी.एम.सावळे प्रा.हितेश वानखेडे, प्रा.पवन निकम ,प्रा.सुर्यवंशी,श्री.सुनील गुरव, श्री.संदिप अमृतकर,श्री.के.एन.कुवर,श्री.नरेंद्र ढोले श्री.ठाकरे, श्रीमती ठाकूर मॅडम,हे देखील स्वच्छता अभियानात सहभागी झाले. पोलिस्टेशन येथील कार्यक्रम आटोपून पुन्हा महाविद्यालयातील बागेची व परिसरातील साफसफाई करण्यात आली.सदर कार्यक्रमास प्रा.पवन निकुम, मौनेश सोनवणे,कु.क्षमा पांडे,कु.चेतना निकुम, कु.डिंपल गांगुर्डे.कु.सुलोनी राऊत,कु.रोशनी ढोले,कु.राजलक्ष्मी शिरसाठ, कु.प्रगती गोसावी,भावसिंग, राकेश,संतोष,दाविद, करण या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार डॉ. एस.एन तोरवणे यांनी आभार मानले..

कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात स्वच्छताही सेवा अंतर्गत पिंपळनेर पोलीस्टेशन येथे श्रमदान.—-‐—————————————कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना या एककाने पिंपळनेर पोलिस्टेशन येथे पोलिस्टेशन च्या आवारातील केरकच-याची 1तास साफसफाई केली.प्रारंभी प्रभारी प्राचार्य के.डी.कदम यांनी रॅलीचे श्रीफळ वाढवून उद्घाटन केले.स्वच्छतेवर घोषणा देत रॅली पिंपळनेर पोलिस्टेशन ला गेली.तेथे पोलिस मित्रांसोबत एन.एस.एसच्या विद्यार्थ्यांनी आवारातील साफसफाई केली.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा.एल.जे.गवळी व विद्यार्थ्यांनी पोलीसांच्या जीवन कार्या बदल एक गीत सादर केले.पिंपळनेर पोलिस्टेशनचे पी.एस.आय.मा.पारधी साहेब यांनी मनोगत व्यक्त करतांना स्वच्छता असली तर आपले आरोग्यतंदुरुस्त राहते.बाह्य स्वच्छता जेवढी महत्वाची तेवढीच आंतरीक स्वच्छता देखील महत्त्वाची असते.प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले घर,आपले अंगण,आपला परिसर,आपली गल्ली,आपले महाविद्यालय,आपले गाव व आपली नदी कसे स्वच्छ राहील यासाठी कटिबद्ध असायला हवे.आपोआप स्वच्छता राखली जाऊन संपूर्ण भारत स्वच्छ होईलअसे मत व्यक्त केले.सदर कार्यक्रमास मा.पी.एस.आय श्री.पारधी साहेब, प्राचार्य श्री.के.डी.कदम सर, पत्रकार श्री.सुभाष जगताप,सर्व पोलीस बंधु,होमगार्ड बंधु भगिनी व महाविद्यालयातील डाॅ.बी.सी.मोरे,डाॅ.एन.बी.सोनवणे,प्रा.सी.एन.घरटे,डाॅ.खरात ए.जी. प्रा.डी.बी.जाधव,प्रा.डाॅ.वाय.एम.नांद्रे प्रा.सी.एन.घरटे,प्रा.पी.एम.सावळे प्रा.हितेश वानखेडे, प्रा.पवन निकम ,प्रा.सुर्यवंशी,श्री.सुनील गुरव, श्री.संदिप अमृतकर,श्री.के.एन.कुवर,श्री.नरेंद्र ढोले श्री.ठाकरे, श्रीमती ठाकूर मॅडम,हे देखील स्वच्छता अभियानात सहभागी झाले. पोलिस्टेशन येथील कार्यक्रम आटोपून पुन्हा महाविद्यालयातील बागेची व परिसरातील साफसफाई करण्यात आली.सदर कार्यक्रमास प्रा.पवन निकुम, मौनेश सोनवणे,कु.क्षमा पांडे,कु.चेतना निकुम, कु.डिंपल गांगुर्डे.कु.सुलोनी राऊत,कु.रोशनी ढोले,कु.राजलक्ष्मी शिरसाठ, कु.प्रगती गोसावी,भावसिंग, राकेश,संतोष,दाविद, करण या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार डॉ. एस.एन तोरवणे यांनी आभार मानले..