शेवाळी दा. ग्रामपंचायत सरपंच पदी महिला उमेदवार सौ सुरेखा दत्तात्रय साळुंके यांची बिनविरोध निवड धुळे..सा पोलीस व्हिजन द्वारा… धुळे जिल्हा व साक्री तालुक्यातील नावलौकिक असलेले नागपूर सुरत महामार्गावरील शेवाळी दातर्ती या गावाच्या ग्रामपंचायतीस एक आदर्श इतिहास आहे. या गावात गुण्यागोविंदाने नागरिक विविध पक्षातील गट तट विसरून ग्रामपंचायतच्या बाबत एक चांगला आदर्श निर्माण करून ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ सुरेखा दत्तात्रय साळुंके यांची मंगळवारी सर्व सदस्य यांच्या निर्णयानुसार एकमताने बिनविरोध निवड करून पुन्हा एक आदर्श निर्माण केला आहे. या निवडीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार देखील गावकऱ्यांनी केला आहे.शेवाळी गावाच्या नवनिर्वाचित सरपंच पदी आता सुरेखा साळुंके या माझी साखरी पंचायत समितीचे सभापती तथा माजी सरपंच नितीन साळुंखे यांच्या त्या काकू आहेत. नितीन साळुंके यांच्या प्रचंड राजकीय अनुभवातून त्यांना नक्कीच या ग्रामपंचायतीचा व ग्रामस्थांचा विकास कामाचा फायदा होणार आहे. शेवाळी दातरती ग्रामपंचायत मावळत्या सरपंच चित्राताई प्रदीप नांद्रे यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या या राजीनाम्यामुळे सदर सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. त्यानुसार सरपंच पदाची फेर निवडणूक कार्यक्रम 26सप्टेंबर 2023 रोजी मंडळ निवडणूक अधिकारी तथा अध्यक्ष गजानन दगडू सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत शेवाळी येथील प्रांगणात नवीन सरपंच पदाची निवडणूक पार पडली. सदर निवडणूक ही बिनविरोध एकमताने जाहीर झाल्याने एकच जल्लोष झाला. शेवाळी ग्रामपंचायतचे सरपंच पद ही महिला प्रवर्गातील राखीव असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सहभाग घेण्यात येणार असल्याबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी तलाठींच्या वतीने सर्व 11 ग्रामपंचायत सदस्यांना लेखी नोटीसद्वारे कळविण्यात आले होते त्यानुसार शेवाळी ग्रामपंचायतचे सर्व 11 सदस्य हजर होते यावेळी सरपंच पदासाठी सुरेखा दत्तात्रय साळुंखे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने मंडळ अधिकारी शेवाळी तथा अध्यक्ष अधिकारी गजानन दगडू सोनवणे यांनी सुरेखा दत्तात्रय साळुंके यांची बिनविरोध एकमताने निवड जाहीर केली.यावेळी ग्रामपंचायत शेवाळीचे ग्राम विकास अधिकारी श्री एम.जी सोनवणे, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्राम सुधार मंडळाचे चेअरमन, सचिव, सदस्य, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे कार्यकारी मंडळ सदस्य, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे प्राध्यापक शिक्षक शिक्षिका गावकरी, तसेच सामाजिक कार्यकर्ते, जातीने उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त सरपंच पदी निवड झाल्या नंतर नवनिर्वाचित महिला उमेदवार सरपंच सौ.सुरेखा दत्तात्रय साळुंके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित महिला सरपंच यांनी गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावचा विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुरेखा साळुंके यांनी दिली आहे. शेवाळी गावातील वार्ड क्रमांक चार (खळवाडी) येथील शिवबाबा केंद्राच्या मागील दोन गल्ल्यांची रस्त्यांची कामे अद्याप प्रलंबित आहेत ते तातडीने व्हावेत यासाठी नवनिर्वाचित सरपंच सौ.सुरेखा दत्तात्रय साळुंके यांनी करून द्याव्यात अशी मागणी वार्ड क्रमांक चार मधील नागरिकांनी केली आहे. या कामात लक्ष लवकरात लवकर घालावे आणि रस्त्यांचे कामे चांगल्या प्रकारे व्हावेत अशी आशा ग्रामस्थांनी सा पोलीस व्हिजन धुळे कडे व्यक्त केली आहे. सरपंच आणि ग्रामसेवक हे नक्कीच याकडे लक्ष घालतील असा विश्वास साप्ताहिक पोलीस व्हिजन ला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *