
[9/8, 9:16 AM] policevision: शेवाळी दा चे लोककलावंत तात्यासाहेब अशोक साळुंके यांच्या लोकगीतास विशेष सन्मान पुरस्कार जिल्हा परिषद धुळे अध्यक्षांच्या हस्ते बहाल[9/8, 9:17 AM] policevision: शेवाळी… प्रल्हाद साळुंके,सा पोलीस व्हिजन धुळे… साक्री तालुक्यातील, शेवाळी दातर्ती हे गाव विविध कलागुणांनी नटलेल्या कलावंतांचे व शिक्षकांचे गाव आहे, या गावात शासकीय अधिकारी व विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी देखील भरपूर प्रमाणात आहेत. या गावात शेतकरी देखील सदन व श्रीमंत आहेत. लोकशाहीर नाट्य कलावंत कैलासवासी विश्वासराव साळुंके यांचे हे गाव या गावात अजूनही पूर्वीपासून आदिवासी बांधव बाशी पोळ्याला लळीद हे रामायण नाट्य कथानक प्रत्यक्ष सोंग धारण करून संपूर्ण राज्यभर हा सामाजिक कार्य साजरा करत असतात. विविध नाट्य या गावात लेखन केले जातात व सादरही केले जातात अशी परंपरा आहे. या गावाला कैलासवासी आत्मारामबाबांसाहेब साळुंके यांच्या स्मरणार्थ सुंदर नाट्यगृह देखील उभारण्यात आले आहे. या गावात वारकरी संप्रदाय अतिशय गुण्यागोविंदाने संपूर्ण गावात भजन कीर्तन सोहळा साजरा करत असतो.सुख असो की दुःख असो, अध्यात्मिक कार्यक्रम असो तेव्हा हेच वारकरी संप्रदाय तेथे आपले मनमोहक भजन व कीर्तनाने सार्यांचे मन आपल्या कडे आकर्षित करून घेण्याची क्षमता यांच्याकडे आहे.या वारकरी संप्रदाय मधील खेळीमेळीच्या माध्यमातुन नाच करून देवाची आराधना करणारे लोककलावंत वारकरी म्हणजे अशोक तात्यासाहेब यांचे नाव लौकिक आहे.गायन कला तात्यासाहेब यांच्या कंठी असल्याने स्वरमालिका त्यांच्या गळ्यात आहेत त्यांच्या या कलेचा सन्मान होणे ही संपूर्ण शेवाळी ग्रामस्थांचा सन्मान झाला आहे.असे आपलेशेवाळी चे लोककलावंत तात्यासाहेब अशोक भगवान साळुंके यांचा जिल्हा परिषदेत, धुळे येथे विशेष सन्मान. शा मा प्रतिष्ठान तर्फे परवा राज्यस्तरीय लोकगीत गायन स्पर्धा संपन्न झाली. त्यात राज्यभरातील कलावंतांनी सहभाग नोंदविला. त्यात 3 मिनिटांच्या वेळेत सादर केलेल्या लोकगीतास उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त झाला. त्याद्वारे आज 4 वाजता धुळे जिल्हा परिषदेत जि प अध्यक्षा प्रतिनिधी मां.प्रा अरविंद जाधव सर यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान मानपत्र,मानचिन्ह, रोख 1500 रूपये देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष पारिजात चव्हाण, शाहीर श्रावण वाणी, सदस्य अनिल जगताप, आकाशवाणीच्या सहयोगी सदस्य पपिता जोशी, साधना शेषराव गोपाळ, जगदीशदादा देवपूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.खानदेशात सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या गावाचे नाव उंच करणारे तात्यासाहेब अशोक भगवान पाटील यांचे सर्व शेवाळी गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.सा.पोलीस व्हिजन धुळे वतीने पुढील वाटचालीस अनंत शुभकामना.🌹🌹🙏
