धुळ्यात आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात..!!
धुळे- (प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या लाठीमाराचा निषेध म्हणुन तसेच जरांडे पाटलांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा म्हणुन आज धुळे येथील मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करून क्युमाइन क्लब समोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी उपस्थितीत आंदोलकांनी राज्य सरकार मधील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन सुरु करण्यापुर्वी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली.यावेळी समाजाचे ज्येष्ठनेते सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई,नानासाहेब कदम, अतुल सोनवणे. निंबा मराठे, विनोद जगताप, विकास बाबर, कैलास मराठे, प्रदीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य विशाल पाटील,अशोक सुडके, बापू पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले, विरेंद्र मोरे,महेश गायकवाड, श्रीरंग जाधव,जितू इखे, मनोज रुईकर, मनोज ढवळे, राजेंद्र ढवले, वाल्मिक मराठे, अरविंद भोसले, वैभव पाटील,बाबाजी पाटील,हेमंत चव्हाण ,विनोद बच्छाव, पप्पू माने, उमेश केवारे,प्रशांत नवले, दीपक रौनदले, बबलू सोनवणे, अमोल रुईकर,राजू महाराज,रवी नागने, बबलू तात्या पाटील, आदींची उपस्थिती होती.मराठा आरक्षण शासन देत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहिला.
