
जय जिजाऊमराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषण करते मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.त्याठिकाणी पोलिस प्रशासनाकडून आंदोलन करत्यांच्या गावातील लोकांना लाठीहल्ला व गोळीबार करण्यात आला याचा निषेध महाराष्ट्रभर चालु आहे.मनोज जरांगे यांची खेडेकर साहेबांनी भेट घेऊन सर्व गावकऱ्यांशी,जखमी गावकर्यांशी संवाद साधला व सर्व जिल्हाभर आंदोलकांनवर दाखल केलेले गून्हे विनाअट व विना शर्त मागेघ्यावे मराठा तरूणांच्या भविष्याची राखरांगोळी होवू नये यासाठी जालना जिल्हाधीकारी पांचाळ साहेब यांच्याशी कायदेशीर बाबीवर चर्चा केली.यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि मा.पुरूषोत्तम खेडेकर साहेब,माजी आमदार रेखाताई खेडेकर,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज भाऊ आखरे,प्रा.डाॅ.सुदर्शन तारख,संतोष गाजरेसह ईतरांची उपस्थिती होती.
