४५ हजार रुपयांची लाच घेताना शाळेचा अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिपाई या तिघे अडकले पोलिसांच्या जाळ्यातAugust 23, 2023…शिरोळ दि.२३ : पवित्र शिक्षण व्यवस्था आता पापेकरी ठरवली जाते आहे.शैक्षणिक संस्था म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजणारे काही शैक्षणिक संस्था आहेत.काही संस्था चांगल्या देखील आहेत .तेथील संस्था चालक शिक्षण महर्षी सुध्दा झाले.पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा एका संस्थेविरुध्द सापळा रचून ४५ हजार रुपयांची लाच घेताना शाळेचा अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि शिपाई या तिघांना जाळ्यात पकडले. शाळेचे अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी, मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील आणि शिपाई अनिल बाळासो टकले या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.

  या गुन्ह्यातील तक्रारदार महिला शिक्षिका संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संकलित अण्णासाहेब विभुते विद्या मंदिर प्राथमिक शाळा, (धरणगुत्ती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे शाळेचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी याने संस्थेच्या इमारतीच्या भाड्यापोटी एप्रिल महिन्याच्या ९५ हजार ५५७ रुपये इतक्या वेतन रकमेची लाच स्वरूपात मागणी करून ती लाच रक्कम दोन हप्त्यात देण्याची मागणी केली. तक्रारदार महिलेने लाचेची ती रक्कम न दिल्याने त्यांची वेतन वाढ रोखण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्यावर दबाव निर्माण करून वेतनवाढ रोखण्याची भीती दाखवली. शाळेचा अध्यक्ष सूर्यवंशी याने लाचेची रक्कम संस्थेचे मुख्याध्यापक महावीर पाटील याच्याकडे देणेस सांगितले. मुख्याध्यापक पाटील याने लाचेची रक्कम शाळेतील शिपाई टकले याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने १७ ऑगस्ट रोजी प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची खातरजमा करून बुधवारी सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून 45 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले.महाराष्टातील अनेक संस्था मध्ये हे असले प्रकार राजरोसपणे सुरू असुन शिक्षकांना नाहक त्रास देण्याचे प्रकार केले जात आहेत.शासन या विषयावर गांभीर्याने बघणार की नाही??हा प्रश्न शिक्षक संतप्त भावनेतून विचारत आहेत.

 या कारवाई पथकामध्ये पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे प्रकाश भंडारे ,सुनील घोसाळकर, विकास माने ,मयूर देसाई, रुपेश माने ,संदीप पवार, सचिन पाटील हे सहभागी होते. पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे ,विजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. सा पोलीस व्हिजन धुळे यांना माहिती प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *