विशेष लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीत अटक

याबाबत वृत्त असे की,सखाराम कडु ठाकरे,विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, ( प्रक्रिया), धुळे अतिरिक्त कार्य. विशेष लेखा परिक्षक, सहकारी संस्था, (भुविकास बॅक), जळगाव व अवसायक श्री. महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था, मर्यादित यावल शाखा सावदा, ता. रावेर यांनी तक्रारदार यांचेकडे ५,००,०००/- रु लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडले म्हणुन गुन्हा दाखल.

तक्रारदार हे जळगाव येथील रहीवाशी असून श्री महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था मर्या. यावल, सावदा, ता. रावेर हि पतसंस्था अवसायानात निघाल्याने सदर संस्थेचे राजे छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल, सावदा मधील गाळा क्र. ०१ असलेल्या कार्यालयाच्या व्यापारी गाळयाची भरलेली सुरक्षा अनामत रक्कम संस्थेचे तत्कालीन प्रशासक अशोक बागल यांनी तक्रारदार यांचे कडुन ३,८५,०००/- माझ्या कडुन रोखीने भरुन घेवुन पावती न देता तक्रारदार यांना ताबा पावती व प्रतिज्ञापत्र लिहून देवून मला सदर संस्थेचा व्यापारी गाळा ताब्यात दिला होता. त्या मोबदल्यात संस्थेचे तत्कालीन प्रशासक अशोक बागल यांनी तकादार यांचेकडे ३,०००००/- रूपयांची मागणी केली होती. परंतु त्यांनी त्याची पुर्तता केली नसल्याने सदर संस्थेची अनामत रक्कम तक्रारदार नावे वर्ग होणेबाबतचे काम करुन दिलेले नाही.

तत्कालीन प्रशासक श्री अशोक बागल यांची बदली झाल्याने सदर संस्थेवर नेमणुक झालेले सखाराम ठाकरे, अवसायक तथा विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, धुळे यांची तक्रारदार यांनी वेळोवेळी भेट घेतली असता, त्यांनी सदर संस्थेच्या गाळ्याची सुरक्षा अनामत रक्कम नगर परिषदेच्या दप्तरी तक्रारदार यांचे नावे पत्र व्यवहार करुन वर्ग करुन देण्यासाठी तक्रारदाराकडे ५,००,०००/- रु. लाचेची मागणी केल्याची दुरध्वनीव्दारे माहीती दिली होती.सदर माहितीवरून ला. प्र. विभाग, धुळे पथकांने पाचोरा येथे जावून तक्रारदार यांचे तक्रार नोंदवून पडताळणी केली असता, सखाराम ठाकरे, अवसायक तथा विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, धुळे यांनी तक्रारदार यांचेकडे ५,००,०००/- रु पंचासमक्ष लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम धुळे मध्यवर्ती बसस्थानकात स्विकारताना दि.१७/०८/२०२३ रोजी रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरूध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. हेमंत बेडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *