अ. यु. क. के. धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नंदुरबार…(प्रतिनिधी)… मंगळवार दिनांक-15-08-2023 रोजी सकाळी ठीक.8.15 वाजता सुंदरदे तालुका जिल्हा नंदुरबार येथील अभय युवा कल्याण केंद्र धुळे संचलित माध्यमिक विद्यालय सुंदरदे, येथे भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून 15 ऑगस्ट 2023 हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के आर सूर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनानुसार 14 ऑगस्ट रोजी सर्व विद्यालयाची व प्रांगणाची स्वच्छता करून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या या उत्साहाची जय्यत तयारी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्री पुरुषोत्तम मराठे सर, श्री नंदकिशोर पोटे सर, श्रीमती वसावे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची राष्ट्रभक्तीपर गीते व कार्यक्रमाचे नियोजन करून घेतले. तर कार्यक्रमाचे संचालन श्री देवरे एच आर यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करणे या कामी काम सांभाळले. विद्यालयाचे कलाशिक्षक श्री प्रल्हाद साळुंके यांनी सुंदर स्वातंत्र्यदिनानिमित्त फलक लेखन व शाळा सुशोभीकरुन आलेल्या मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी मध्ये श्री कालिदास पाडवी, भिकू भाई बंजारा, श्रीमती संगीता बच्छाव, यांनी 14 ऑगस्ट रोजी संपूर्ण शाळेची उत्तम प्रकारे स्वच्छता मोहीम राबवली. सुरुवातीला या कार्यक्रमाचे आलेल्या मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. त्यानंतर भारत मातेच्या प्रतिमेला पूजन करून. प्रमुख मान्यवर नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य ताईसो. राजश्री शरद गावित यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी, श्री प्रवीण व्ही अहिरे साहेब, माननीय श्री निलेश जी पाटील साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नंदुरबार, माननीय श्री डॉक्टर सचिन गोसावी साहेब विस्तार अधिकारी नंदुरबार जिल्हा, माननीय श्री एस एन पाटील (साळुंके) साहेब शिक्षण विस्तार अधिकारी नंदुरबार जिल्हा, श्री. जे ए चौरे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी नंदुरबार जिल्हा, श्री एस एम पाटील साहेब विस्तार अधिकारी नंदुरबार जिल्हा, श्री एल जी देसले साहेब केंद्र प्रमुख सुंदरदे, श्री सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य पालक वर्ग सुंदरदे, करणखेडा, पापनेर, बंदरी झिरा, यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रीय मानव मिशन अंतर्गत योजनेतून विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या एकूण 26 विद्यार्थिनींना चांगल्या प्रकारे सायकली प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या. विद्यालयाच्या सायकल वाटपाच्या कार्यक्रमावरून तसेच विद्यालयाची झालेली प्रगती यावरून जिल्हा परिषद सदस्य ताईसो राजश्री शरद गावित यांनी मनभरून कौतुक केले. यावेळी विद्यालयातील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांचा नृत्यातून देशाला सलामी दिली. यावेळी राष्ट्रगीत, झेंडा गीत, महाराष्ट्र गीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे साऊंड सिस्टिम ची महत्त्वपूर्ण कामगिरी विद्यालयाचे उपशिक्षक श्री वाल्मीक सुरवाडे सर यांनी उपलब्ध करून देऊन अनमोल सहकार्य केले.या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याने कार्यक्रम उत्साह पूर्ण साजरा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *