मुंबई…काँग्रेस पक्षाच्या”शिक्षक विभागाच्या”शिक्षक/पदवीधर आमदार समितीची” बैठक दिनांक २५जुलै२३ रोजी विधानभवन काँग्रेस कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीस मा.आ.जयंत असगावकर,मा.आ.अभिजित वंजारी,मा.आ.सुधाकर अडबले, मा.आ.धीरज लिंगाडे उपस्थित होते.या बैठकीचे प्रयोजन हे समिती समन्वयक प्रा. प्रकाश सोनवणे यांनी प्रथम विषद केले.सर्व स्तरावरील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच सुटले पाहिजेत असे प्रा.प्रकाश सोनवणे यांनी या बैठकीत आवर्जून सांगितले व ते सर्व मा.आमदार महोदयांनीही मान्य केले. ही समिती या पुढील काळात सरकार व शिक्षण खाते यांच्यावर एक “दबाव गट”वापरुन सर्व स्तरावरील शिक्षकांचे प्रश्न सोडवेल असेही या बैठकीत ठरले. यापुढची समिती बैठक ही मा. प्रांताध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होईल व या पुढील काळात शिक्षकांसाठीचां लढा हा तीव्र करण्यात येईल असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. प्राथमिक शिक्षकांसाठी काँग्रेस पक्षाच्या शिक्षक विभागाचा एक सलग्न विभाग करण्याचे मा.आ. धीरज लिंगाडे यांनी सुचविले व ते या बैठकीत सर्व मान्य करण्यात आले. प्रा. प्रकाश सोनवणे ,अध्यक्ष शिक्षक विंभाग, MPCC
