शेवाळी – साक्री तालुक्यातील शेवाळी येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात पोपटराव साळुंके यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहावीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामसवाडी येथील खानदेश एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी निंबा साळुंके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. व्ही. पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन साळुंके, मार्केट कमिटीचे संचालक दीपक साळुंके, माजी उपसरपंच माधवराव नांद्रे, माजी सरपंच दगाजी साळुंके, राजू साळुंके, अशोक साळुंके, सुभाष नेरकर, पोपटराव साळुंके, उपसरपंच केतन साळुंके, पंडित साळुंके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र साळुंके व पुष्पेन्द्र साळुंके यांनी केले.
यावेळी दीपक साळुंके, जितेंद्र साळुंके, निंबा साळुंके यांनी पोपटराव साळुंके यांच्या स्मृतिदिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून मान्यवरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता नाईक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
