सप्तशृंगी गडावर भीषण अपघात लाल परी एसटी बस दरीत कोसळली!!

नाशिक क्राईम न्यूज ब्युरो:-सुंदर व आकर्षक मनमोहक असे निसर्गरम्य वातावरणात असलेले नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी येथील शक्तीपीठ आदी जगदंबे सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी एक दुर्दैवी घटना घडली आहे.सदर नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना अशी की,सप्तश्रृंग गडावरून खामगावला जाणाऱ्या लाल परी एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस सप्तश्रृंगी घाटातील दरीत कोसळली.या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून १९ ते २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव आगाराची बस सप्तश्रृंग गडावरून खामगावला जाण्यासाठी निघाली होती.या लाल परी बसमधून २० ते २५ प्रवासी प्रवास करीत होते.वणी गड उतरत असताना गणपती पॉईंटजवळ चालकाचे अचानक बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस थेट दरीत कोसळली.बस कोसळताना भयंकर घरघर असा आवाज व किंचाळ्या येऊ लागल्या.

या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं.झाडी झुडपे असल्याने मदत कार्य करतांना अडचणी येत होत्या.जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.दरम्यान, या घटनेनंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मदतीच्या सूचना दिल्या आहेत.

“वणी घाटात लाल परी एस टी.बस अपघात झाला आहे.त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत.बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुन नातेवाईक व बघ्यांची गर्दी जमली आहे.ही खामगाव डेपोची बस असून त्यातील १८ प्रवासी जखमी आहेत.

अपघात गणपती पॉईंटजवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अशी प्राथामिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही.यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना”अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भूसे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *