[6/23, 4:15 PM] policevision: सोलापूर…शहरातील न्यायालयीन प्रकरण सा पोलीस व्हिजन व्दारा…सोलापुर शहराचे उच्चभ्रु भागात राहणारे आजी आजोबा प्रतिथयश उद्योगपती रामेश्वर वय 65 वर्ष आणि महालक्ष्मी वय 60 वर्ष या आजी-आजोबाने नातू अश्वथ वय 9 वर्ष याचा कायमचा ताबा मिळण्यासाठी सुने विरुद्ध ॲड.श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील मेहरबान. कौटुंबिक न्यायालयात परमनंट चाईल्ड कस्टडीचा (Permanant Child Custody) चा दावा दाखल केलेला आहे.
यात केसची हकीकत अशी की – उद्योगपती आजी-आजोबांचे मोठा उद्योगधंदा असून त्यांचा मुलगा मंगेश यांचा सून अवनी यांच्यासोबत दहा वर्षांपूर्वी सोलापुर येथे विवाह झालेला होता व सदर लग्नातुन नातु अश्वथ (सध्पा वय 9 वर्ष) यांचा जन्म झाला होता व सर्वजण एकत्र कुटुंबात आनंदाने राहत होते आणि या नातवाचा आजी- आजोबांसोबत खुपच जास्त लळा व प्रेम बसला होता व नातु लहानाचा मोठा सुद्धा या आजी-आजोबांकडे झालेला होता व सताता तो त्पांचेकडेच राहत होता आणि आजी-आजोबा व नातू यांचा भावनिक अटॅचमेंट व लळा होता व मध्यंतरी चार वर्षापुर्वी मुलगा मंगेश यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे सुन अवनी ही तीन वर्षांपूर्वी नातू अश्वथ याला घेऊन परस्पर माहेरी निघून गेली व माहेरी गेल्यापासून नातू अश्वथ यास आजी-आजोबा यांच्यापासून मुद्दामपणे लांब ठेवू लागले व त्यांना भेटण्यास मज्जाव करत होती व त्यामुळे नातवाचे विरहामुळे व तसेच सुनेच्पा स्वभावामुळे आजी-आजोबा पार खचुन गेले होते व तसेच नातवाला सुद्धा सुनेने चांगल्या प्रकारे सांभाळ करीत नसल्यामुळे व नातू सतत आजारी पडत होता,त्यामुळे आजी-आजोबा हे नातवास पाहण्यासाठी गेले असता सुद्धा सुनेने नातवास पाहू न देता आजी-आजोबा यांना हाकलून दिले व तसेच सुनेने दुसरे विवाह करण्याच्या तयारीत असल्याच्या समजल्यामुळे आजी-आजोबा हे नातवाचे पालन संस्कार,संगोपन चांगल्या प्रकारे होणेसाठी नातवा चे उज्वल भविष्य घडविण्यासाठी आजी-आजोबा हे नातू अश्वथ वय 9 वर्ष याचा कायमचा ताबा व पालन पोषण,संगोपन आणि चांगले शिक्षण व उज्जवल करियर करण्यासाठी आजी-आजोबां हे नातवाचे परमनंट कस्टडी मिळण्यासाठी हिंदू गार्डियन अँड.वार्डस अँक्ट नुसार परमनंट चाइल्ड कस्टडी साठी अँड.श्रीनीवास कटकुर यांचेमार्फत सोलापुर येथील कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली व याकामी कोर्टाने सुन अवनी यांना कोर्टात हजर राहुन म्हणणे सादर करणेचा आदेश पारीत करणेत आला.
[6/23, 4:16 PM] policevision:
