
💥आज दिनांक २० जून रोजी प्रदेश कार्यालय टिळक भवन मुंबई येथे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत अनुसूचित जाती विभागाची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. या बैठकीत अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष मा.नाना पटोले जी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नेते AICC G.S. आदरनीय मुकुल जी वासनिक साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमास मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी अध्यक्षा प्रा. वर्षाताई गायकवाड उपस्थित होत्या. काँग्रेस पक्ष शिक्षक नेते(प्रदेश अध्यक्ष शिक्षक विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) प्रा.प्रकाश सोनवणे यांनी या प्रसंगी माजी शिक्षण मंत्री वर्षा ताईंशी शिक्षकांच्या प्रश्ना संदर्भात चर्चा केली व नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक संघर्ष समितीच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे विनंती केली असता, या संघर्षात मी आपल्या सोबत असे आश्वासन ताईंनी प्रा.प्रकाश सोनवणे सर याना दिले. सातत्याने शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात कार्यरत असलेल्या प्रा.सोनवणे सर यांचे मनस्वी आभार .💐💐💐🌹🌹🙏🙏