Related Posts
धुळे पोलीसांनी मोटार सायकल चोरट्यास पकडले धुळे …सा पोलीस व्हिजन क्राईम न्यूज ब्युरो…. धुळे येथे वाहनाच्या व मोबाईलच्या वाढत्या चोरीमुळे जनता परेशान झाली पोलिसांकडे तक्रारी वाढल्या आहेत. साखरी सुरत बायपास वरील धुळे येथील शासकीय जिल्हा रूग्णालय परिसरातून दुचाकी लंपास करणार्या मालेगावच्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्याने या चोरलेल्या मोटरसायकली लपवून ठेवल्या नेमक्या त्याने या मोटरसायकली कुठे लपवल्या आहेत याचा खाकी दंडुका दाखवल्यावर पोलिसांना त्याने मोटरसायकली लळींग कुरणात लपवून ठेवलेल्या आहेत असे सांगितले.त्या ५ दुचाकी पोलीसांकडुन हस्तगत करण्यात आल्या.शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील शौचालयाजवळ एक जण चोरीच्या दुचाकीसह उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरिक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने बसस्थानक परिसरातून निसार शहा पिरन शहा (रा.मास्टर कॉलनी, रमजानपुरा, मालेगाव, जि.नाशिक) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने धुळ्यासह नाशिक जिल्ह्यातून देखील दुचाकी लंपास केल्या होत्या. तसेच या दुचाकी धुळे शहरानजीक असलेल्या लळींग कुरणात लपवून ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याकडून ८५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त केल्या. त्याच्याकडून शहर पोलिसात दाखल दुचाकी चोरीच्या एका गुन्ह्याचीही उकल झाली आहे. पोलिसांनी आपली ही कारवाई अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक श्रीराम पवार, पोसई योगेश राऊत, अमरजित मोर, रविंद्र बागुल, असई संजय पाटील, पोहेकॉ संतोष हिरे, पोना रविकिरण राठोड, पोकॉ सुशिल शेंडे, निलेश पोतदार, गुणवंत पाटील, सागर शिर्के यांच्या पथकाने केली. या कारवाईने धुळे पोलिसांचे जनतेकडून कौतुक होत आहे. अनेक दिवसांपासून चोरीला गेलेले मोबाईल देखील अशाच पद्धतीने लवकर मिळावेत असे पोलिसांना आवाहन करण्यात आले आहे.बातमी पत्र वाचा सा पोलीस व्हिजन धुळे
- Pralhad Salunkhe
- June 26, 2024
- 0
श्रीयुत रविकर बागुल यांची ३८ व्या किशोर आणि किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती.
- Pralhad Salunkhe
- November 30, 2023
- 0
वृत्त प्रतिनीधी- धनंजय गाळणकर३८ व्या किशोर आणि किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा […]
शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत समन्वयक प्रा प्रकाश सोनवणे यांचे शासनाकडे साकडे
- Pralhad Salunkhe
- July 26, 2023
- 0
मुंबई…काँग्रेस पक्षाच्या”शिक्षक विभागाच्या”शिक्षक/पदवीधर आमदार समितीची” बैठक दिनांक २५जुलै२३ रोजी विधानभवन काँग्रेस कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीस […]