धुळ्यात धार्मिक मंदिरातील मूर्तीची विटंबना!!! मोगलाई परिसरात तणावाची स्थिती

धुळे…. धुळे शहरांमध्ये अनेक दिवसापासून शांतता होती. परंतु काही दृष्ट या आपल्या धुळे शहराला या ना त्या अपवादाने अथवा शांत धुळे नेहमी धगधगते कसे राहावे!!! यासाठी प्रयत्न करत असतात. सामाजिक तेढ कशी निर्माण होईल! याबाबत काही दृष्ट प्रवृत्तीची टवाळखोर पोरांकडून आपले हे शांत असलेले धुळे शहर बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात. अशीच एक घटना पुन्हा धुळ्यात घडली.धुळे शहरातील नावाजलेला साखरी रोड परिसरातील मोगलाई परिसरात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भात धार्मिक स्थळाची विटंबना करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. दरम्यान, या घटनेतील संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे तीन आरोपी असून, यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलिसांचे नागरिकांना सामूहिक आव्हान करण्यात आले आहे की आपण शांततेचा मार्ग अवलंबवा, तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, जिल्ह्यात शांतता राखावी असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.
सदर या घटनेतील आरोपींवर विविध व कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फिर्यादीच्या माहितीनुसार अन्य संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांची चौकशी,व गुन्हा दाखल करण्यात येईल व हे कृत्य का? व कोणी घडून आणले याचा मास्टर माईंड कोण याचाही सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेतील प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही धुळेकरांनी शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी केल आहे. पोलीस बारकाईने या परिसरात लक्ष घालत आहेत. पोलीस ताफा वाढवण्यात आलेला आहे. कायदा सुव्यवस्था कुणीही हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा मोठी कारवाई करण्याचे संकेतही पोलीस विभागाने दिलेले आहेत.बातमी पत्र वाचा साप्ताहिक पोलीस व्हिजन धुळे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *