मयतांच्या बँक खात्यांमधील रक्कम मिळण्यासाठी वारसांना होतोय मनस्ताप!!

धुळे…. प्रत्येक व्यक्तीचे या ना त्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपापले सेविंग किंवा पेन्शन,इतर खाते उघडवलेले असतात. या खात्यांवर काही पेन्शन धारकांचे पेन्शन रक्कम ही जमा केलेली असते वयोवृद्धांना त्यांच्या काटकसरीच्या जीवन जगण्याच्या सवयी मुळे पेन्शन रक्कम ही दरमहा त्या त्या खात्यांमध्ये वाढत गेलेली असते. आणि त्या रकमेचा थोडा फारच खर्च हा वृद्ध पेन्शनधारक करत असतात. त्यातून बँकेत बचत जास्त प्रमाणात होत असते. कालांतराने ही रक्कम लाखो रुपयांमध्ये होते. वयोवृद्धांचे एकच विचार असतो. ती रक्कम ही पुढे आपल्याच कार्यासाठी किंवा आपल्या मुलांना मुलींना ही रक्कम कामी यावी. हा शुद्ध विचार त्यांच्या मनात असतो. वयोवृद्धांना बँकेत वारंवार जाणे कठीण होत असते. त्याचे मुख्य कारणही आहे. त्यांचे आरोग्य साथ देईना. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पेन्शन खाते असल्याने. तेथे प्रचंड गर्दी आणि त्या गर्दीत रांगेत तासनतास उभे राहणे त्यांना शक्य नसते. याच कारणातून कंटाळवाणा येणे बँकेत वारंवार न जाणे त्यातून रक्कम त्या ठिकाणी पडून राहणे अशा प्रकारे सदर रक्कम ही वाढत जाते कालांतराने वृद्धापकाळाने किंवा दीर्घ आजारातून या पेन्शन धारकांचे निधन होते. निधन झाल्यानंतर त्यांच्या दाम्पत्यांना यांचे जेथे जेथे खाते असतात तेथे तेथे आता पाठपुरावे करण्यासाठी व अडकलेली रक्कम काढण्यासाठी तारेवरची कसरत आता खरी सुरू होते. बँकेत पैसे भरणे सोपे परंतु आपलेच पैसे काढणे जेव्हा कठीण होते. तेव्हा नाकेनौ येऊन जाते. बँकेचे शाखाप्रमुख विविध कारणे सांगून टाळाटाळ करतात. यातून अनेक कुटुंबांमध्ये काही जण बँकेपर्यंत पोहोचू शकत नाही अशीही परिस्थिती असते. अशा कुटुंबां बाबत खूपच त्रास होत असतो. काही कुटुंबांमध्ये कोणी अपंग तर कोणी अगदी लांब पर राज्यात राहतात. बँकेच्या खात्यांवर वारस लावलेला नसतो. आणि वारस लावलेल्या नसल्याकारणाने या बँकेमधील रक्कम मिळण्यासाठी संपूर्ण कुटुंबांमध्ये जेवढे रक्ताच्या नात्यातील जन्मलेले वारस असतील मग त्यात मुली असो किंवा मुले असो या सर्वांना एकत्र जमवण्याची अत्यंत कठीण अशी परिस्थिती निर्माण होते. ग्रामीण भागातील बँकांमध्ये अतिशय जास्त प्रमाणात त्रास दिला जातो. ग्रामसेवक सरपंच तलाठी यांचे दाखले पंचनामे विविध स्टॅम्प पेपरवर करून आणण्याचा आग्रह केला जातो. सरपंच ग्रामसेवक तलाठी यांना प्राधान्य दिले जाते. ते खातेदार यांचे वारसांची ओळख करतात किती हा अजब आणि गजब प्रकार आहे!!! खाते उघडताना कुटुंबातील व्यक्ती आणि त्या बँकेतील खातेदार कुणीही असो ते ओळख म्हणून स्वाक्षऱ्या करतात आणि खाते उघडले जाते. तेव्हा ग्रामसेवक सरपंच किंवा तलाठी यांच्या स्वाक्षऱ्या नसतात त्यांना विचारून खाते ओपन केलेले नसते. मग त्या कुटुंबातील खातेदाराचे मृत्यूनंतर ग्रामसेवक तलाठी सरपंच यांच्या दाखल्याचे काम काय?? हा सवाल उपस्थित कुणीही करत नाही त्यांनी सांगावे आणि आपण वेड्यासारखी कागदपत्र जमा करत फिरावीत. यामुळे वर्षानुवर्ष निघून जातात. कुटुंब त्यातून मनस्तापाच्या फेऱ्यांमध्ये अडकलेले असते. एखादा फिरणारा असतो त्याच्यावर संशय निर्माण होतो हेतू पुरस्कार पैसे काढून दिले जात नाहीत असाही आरोप होतो. मात्र खरे कारण बँकांमध्ये कागदपत्रांसाठी होत असलेली अडवणूक हेच मुख्य कारण असते. तुमचे सर्वजण एकाच वेळी उपस्थित राहणे देखील गरजेचे आहे असे सांगितले जाते.त्यामुळे कामा निमित्ताने विविध ठिकाणी विखुरलेले कुटुंब एकत्र येण्यास फार त्रास होत असतो. यामुळे वर्षानुवर्ष या रकमा अडकून पडलेल्या असतात. राष्ट्रीयकृत बँकांना सर्व वारस एकत्र येऊनच वकील मार्फत नोटरी करून बँकेने दिलेले वीस ते बावीस प्रकारचे फॉर्म 500 रुपये ते शंभर रुपये असे तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत खर्च करून सगळे दस्तावेज तयार करून राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावे लागतात त्यास विटनेस म्हणून आधार कार्ड सह दोन जण लागतात. प्रत्येक वारसाचे फोटो आधार कार्ड व स्वतः हजर राहून मगच पुढची प्रोसेस केली जाते. यासाठी कुणाचे पॅन कार्ड नसते तर कुणाचे आधार कार्ड नसते अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. वारंवार वेंडर कडे जाऊन विविध स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागतात. यासाठी पैसा व हेलपाटे करत ना त्यांना आलेली असते. म्हणून या बँकांची वारसांना मिळणारी रक्कम अगदी सहज मिळेल यासाठी शासनाने एकच फॉर्म भरून ऑनलाईन लिंक द्वारा कागदपत्र सादर करून सुविधा करून दिल्यास नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. प्रत्यक्ष बँकांमध्ये जाऊन हे काम करत असताना खूप त्रास होत असतो. आणि त्यातून आपापसात वाद देखील होत असतात. हे सर्व टाळण्यासाठी एक स्वतंत्र सुविधा ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा वारसांशी संवाद साधून कुटुंबातील एका व्यक्तीला अधिकार प्राप्त करून देत अशा रकमा सहज कशा देता येतील यासाठी शासनाने सोय करून दिल्यास नागरिकांची दमछाक थांबणार आहे. असे सामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *